लॉकडाऊनमध्ये फिरणाऱ्या पर्यटकांना पोलिसांनी दिली अजब शिक्षा

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊनमध्ये नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास बंदी आहे. असे असताना देखील काहीजण घराबाहेर फिरताना आढळतात.अशा नागरिकांना पोलिसांकडून आरती करण्यापासून ते उठाबशा काढण्याची देखील शिक्षा दिली जाते.

आता उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे फिरणाऱ्या पर्यटकांना पोलिसांनी अजब शिक्षा दिली आहे.

लॉकडाऊन असताना देखील बाहेर फिरणाऱ्या या पर्यटकांना पोलिसांनी 500 वेळा सॉरी लिहिण्यास सांगितले. लॉकडाऊनच्या नियमांचे पालन न केल्याने 10 पर्यटकांना 500 वेळा सॉरी लिहिण्यास लावले.

या संदर्भात सब-इंस्पेक्टर विनोद कुमार यांनी सांगितले की, शिक्षा म्हणून सर्वांना 500 वेळा सॉरी लिहिण्यास सांगितले. सर्वांनी लिहिली की, आम्ही नियमांचे पालन केले नाही म्हणून आम्ही मागतो.

Leave a Comment