लॉकडाऊन : आता पॉलिसीमधून देखील काढता येणार पैसे

कोरोना संकटामुळे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. सर्व सेवा बंद असल्याने नागरिकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. मात्र आता सरकारने पीएफ आणि एनपीएस खात्यातून रक्कम काढण्याची परवानगी देत नागरिकांना दिलासा दिला आहे. याशिवाय जीवन विमाच्या यूनिट-लिंक्ड विमा प्लॅन (यूलिप) आणि यूनिट-लिंक्ड एंडोमेंट प्लॅनमधून देखील पैसे काढू शकतात.

ही सुविधा सर्वसाधारण जीवन विमा योजनेत नाही. या संदर्भात भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (इरडा) नवीन गाईडलाईन जारी केली आहे. यात सम एश्योर्ड रक्कमच्या 25 टक्के रक्कम काढता येते. यावर कोणताही कर लागणार नाही.

ही रक्कम काढण्यासाठी काही अटी आहेत. यामध्ये पॉलिसीधारकाचे वय कमीत कमी 15 वर्ष असावे. मुलांचे शिक्षण, मुलगा/मुलीचे लग्न, आजार, घर अथवा संपत्ती खरेदी करायचे अल्यास तुम्ही ही रक्कम काढू शकता. पॉलिसीच्या कालावधी दरम्यान 3 वेळाच फंड वॅल्यूच्या 25 टक्के रक्कम काढू शकता. याशिवाय फंडमध्ये एक वर्षांचा प्रिमियम बाकी असणे आवश्यक आहे.

समजा, तुमच्या यूलिप प्लॅनची सम एश्योर्ड रक्कम 5 लाख रुपये आहे आणि वार्षिक हप्ता 30 लाख रुपये आहे. 5 वर्षात तुम्ही 1.5 लाख रुपये जमा केले. यावर व्याज मिळून फंड वॅल्यू 2 लाख रुपये झाली. आता गरज पडल्यास यातील 25 टक्के रक्कम म्हणजेच 50 हजार रुपये तुम्ही काढू शकता. मात्र नंतर तुमची सम एश्योर्ड रक्कम 5 लाखावरून कमी होऊन 4.5 लाख रुपये होईल.

Leave a Comment