जागतिक बँकेकडून भारताच्या ‘आरोग्य सेतू’ अ‍ॅपचे कौतूक

कोरोना व्हायरसची माहिती लोकांपर्यंत पोहचावी आणि लोकांना लक्षण जाणून घेऊन चाची करण्याची गरज आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी सरकारने आरोग्य सेतू हे अ‍ॅप लाँच केले आहे. याद्वारे तुमच्या आजुबाजूला कोरोना संक्रमित व्यक्ती आहे की नाही याची देखील माहिती मिळते.

भारताने हे अ‍ॅप लाँच करत अनेक दिग्गज कंपन्यांना मागे सोडले आहे. विशेषज्ञ आणि अनेक एजेंसीनी या अ‍ॅपचे कौतूक केले आहे. आता जागतिक बँकेने देखील अ‍ॅपचे कौतूक करत म्हटले की, या अ‍ॅपने नवीन रस्ता दाखवला आहे.

आरोग्य सेतू लाँच झाल्यानंतर जागतिक टेक्नोलॉजी कंपनी अ‍ॅपल आणि गुगलने देखील कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अ‍ॅप बनवणार असल्याची घोषणा केली आहे.

नीति आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी ट्विटरवर अ‍ॅपलचे सीईओ टिम कूक आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना टॅग करत लिहिले की, भारत कोव्हिड-19 च्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे नेतृत्व करत आहे. युजर्सची माहिती गोपनीय ठेवत याला डिझाईन करण्यात आले आहे. आम्हाला आनंद आहे की आरोग्य सेतूप्रमाणेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी अ‍ॅपल आणि गुगल मिळून याप्रकारचा अ‍ॅप तयार करत आहेत.

जागतिक बँकेने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले की, कोव्हिड-19 चा प्रसार पाहण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करता येईल. पुर्व आशियामध्ये महामारीचा सामना करण्यासाठी ही योजना फायदेशीर ठरले आहे. भारताने काही दिवसांपुर्वीच आरोग्य सेतू अ‍ॅप लाँच केला आहे. जो युजर्सच्या स्मार्टफोनच्या लोकेशनचा उपयोग करून युजर्स कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात तर आलेला नाही, याची माहिती देते.

Leave a Comment