जगभरात 17 लाख 80 हजार रुग्ण, तर 1 लाख 8 हजारांपेक्षा जास्त लोकांचा बळी


मुंबई : जगभरातील अन्य देशांमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा जवळपास 17 लाख 80 हजारांच्यावर पोहचला आहे. तर 1 लाख 8 हजारांवर (10771) जगभरात कोरोनामुळे गेलेल्या बळींची संख्या गेली आहे. तर या आजारातून चार लाख 3 हजार रुग्ण बरे झाले आहेत, अजून जवळपास 12 लाख 68 हजार लोक कोरोनाग्रस्त आहेत. तर त्यातील चार टक्के म्हणजे 50 हजार 590 गंभीर आहेत.

कोरोनाचा हाहाकार अमेरिकेत सुरुच असून 20 हजार बळींचा आकडा अमेरिकेने ओलांडला आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासात 1830 बळी गेले आहे. आता अमेरिकेत एकूण बळींची संख्या 20 हजार 577 वर पोहोचली आहे, तर रुग्णांची संख्या पाच लाख 33 हजारांवर गेली आहे. न्यूयॉर्कमध्ये काल 783 बळी गेले असून, तेथील रुग्णांची संख्या 1 लाख 81हजार तर एकूण मृतांचा आकडा 8627 एवढा आहे. त्या खालोखाल न्यूजर्सीत 2183, मिशिगनमध्ये 1392, लुझियाना 806, इलिनॉईस 677, कॅलिफोर्निया 630 आणि वॉशिंग्टनमध्ये 494 लोकांचा बळी या रोगाने घेतला आहे. अमेरिकेने गेल्या 11 दिवसात तब्बल 15 हजार 492 लोक गमावले.

गेल्या चोवीस तासात स्पेनमध्ये ५२५ लोक गमावले आहेत. तर मृतांचा आकडा १६ हजार ६०६ वर पोहोचला आहे. स्पेनमध्ये गेल्या अकरा दिवसात ८ हजार १४२ लोकांचा जीव गमावला आहे. तर इटलीत काल ६१९ माणसांचा बळी घेतला. आता इटलीतील एकूण बळींची संख्या १९ हजार ४६८ इतकी झाली आहे. काल 7 हजार सातशेने रुग्णांची संख्या वाढली, इटलीत आता जवळपास १ लाख ५२ हजार रुग्ण आहेत.

काल दिवसभरात इंग्लंडमध्ये ९१७ लोकांचा जीव गेला, तेथील बळीचा आकडा ९,८७५ वर पोहोचला आहे. फ्रान्समध्ये काल दिवसभरात ६३५ लोकांनी आपला जीव गमावला आहे. तिथे आत्तापर्यंत १३ हजार ८३२ बळी गेले आहेत तर एकूण रुग्ण १ लाख ३० हजारांच्या वर गेले आहेत. जर्मनीत काल १३५ बळी गेले आहेत तर एकूण बळींची संख्या २,८७१ एवढी झाली आहे.

इराणमध्ये काल बळींच्या संख्येत १२५ ची भर पडली. इराणमध्ये एकूण ४,३५७ मृत्यू झाले असून रुग्णांची संख्या ७०,०२९ च्या वर पोहोचली आहे. बेल्जियममध्ये कोरोनामुळे काल ३२७ मृत्यूमुखी पडले, एकूण बळींचा आकडा ३,३४६ वर पोहोचला आहे. हॉलंडमध्ये काल १३२ बळी घेतले, तिथे एकूण २,६४३ लोक दगावले आहेत. टर्की ११०१, ब्राझील ११४०, स्वित्झर्लंडने १,०३६, स्वीडनमध्ये ८८७, पोर्तुगाल ४७०, कॅनडात ६५३, इंडोनेशिया ३२७, तर इस्रायलमध्ये १०० बळी कोरोनामुळे गेले आहेत. दक्षिण कोरियात काल ३ मृतांची भर पडली, एकूण मृतांचा आकडा २११ वर पोहोचला आहे. आपला शेजारी पाकिस्तानात रुग्णांची संख्या ५,०११ वर पोहोचली आहे, तिथे ८६ लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. गेल्या २४ तासात जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये ८०,२१८ तर बळींच्या आकड्यात ६,०८३ ची भर पडली आहे.

Leave a Comment