साताऱ्यात ‘सारी’ची तपासणी करायला गेले निघाले कोरोनाग्रस्त


सातारा – एकीकडे राज्यावर कोरोनासारखे मोठे संकट कोसळलेले असतानाच ‘सारी’च्या आजारानेही आपले डोकेवर काढायला सुरुवात केली आहे. या आजाराचे सर्वाधिक रुग्ण औरंगाबादमध्ये असून, त्यापाठोपाठ राज्यातील इतर भागातही ‘सारी’चे रुग्ण आढळून येत आहे. ‘सारी’ सदृश्य लक्षणे सातारा जिल्ह्यात दिसून आल्याने काहीजणांची तपासणी आरोग्य विभागाने केली. यात त्यांना सारी ऐवजी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

औरंगाबाद शहरात कोरोनाबरोबरच ‘सारी’च्या आजाराने आपले हातपाय पसरले आहेत. सारीमुळे आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने सारीच्या आजारामुळे अधिकाधिक तपासण्या करण्याची सूचना केली आहे. सातारा जिल्ह्यातील सात जणांना ‘सारी’ सदृश्य लक्षणे दिसून आल्याने त्यांची आरोग्य प्रशासनाने तपासणी केली. त्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे या सातपैकी चार जणांनी कुठेही प्रवास केला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Comment