पुण्यातील एकट्या भवानी पेठेत तब्बल 56 कोरोनाग्रस्त


पुणे : जगभरातील अनेक देशांसह आपल्या देशावर आलेले कोरोनाच्या संकटाचे सावट दिवसेंदिवस गडद होत असतानाच पुण्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात लक्षणीय वाढ होत आहे. त्यातच आज पुण्यात दोन महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनामुळे आतापर्यंत पुण्यात 31 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. पुण्यातील कोणत्या वॉर्डमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक (11 एप्रिलपर्यंत) झाला आहे, याची माहिती महापालिकेने जारी केली आहे. पालिकेच्या माहितीनुसार भवानी पेठ परिसरात सर्वाधिक म्हणजे 56 रुग्ण सापडले आहेत.

कोरोनामुळे आज पुण्यातील संगमवाडी परिसरातील 58 वर्षीय आणि सोमवार पेठेतील 56 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. दोन्ही रुग्णांना कोरोनाशिवाय इतर आजारही जडलेले होते. दरम्यान, भवानी पेठ परिसरात सर्वाधिक प्रादुर्भाव झाल्याचे दिसत आहे. दोन दिवसात 16 रुग्णांची वाढ झाल्याने येथील कोरोनाग्रस्तांची संख्या 56 झाली आहे. कसबा-विश्रामबाग वाडा भागात 29, तर धनकवडी-सहकारनगरमध्ये 14 रुग्ण आहेत. पुण्यात कोरोनाबाधितांचा मृत्यूदर देशात सर्वाधिक आहे. पुण्याचा मृत्यूदर हा 11. 96% असून त्या तुलनेने जगाचा मृत्यूदर 5.97 टक्के आहे.

Leave a Comment