अभिमानास्पदः अमेरिकेसह १३ देशांसाठी ‘जीवरक्षक’ बनला भारत


नवी दिल्ली – अमेरिकेने भारताला ज्या औषधांसाठी धमकी वजा इशारा दिला होता, भारत सरकारने ती हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधे १३ देशांसाठी पाठवण्याची परवानगी दिली असून त्यात अमेरिकेचाही समावेश आहे. अमेरिका, स्पेन, जर्मनी, बहरिन, ब्राझिल, नेपाळ, भूतान, श्रीलंका, अफगाणिस्तान, मालदिव आणि बांगलादेश या १३ देशांचा हायड्रॉक्सीक्लोरोक्विन पाठवण्यात येणाऱ्या देशांमध्ये समावेश आहे. भारताकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या ४८ लाख गोळ्या अमेरिकेने मागितल्या होत्या. ३५.८२ लाख गोळ्या पाठवण्यास भारताने मंजुरी दिली आहे.

तोंडावाटे घेण्याच्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या गोळ्या आहेत स्वप्रतिकारशक्ती कमी झाल्याने होणाऱ्या रोगात त्यांचा वापर केला जातो. हे औषध मलेरियाविरोधात वापरल्या जाणाऱ्या क्लोकोक्विन या गोळीच्याच प्रजातीचे आहे. पण त्याचा वापर हृदयाच्या संधीवातावर केला जातो.

Leave a Comment