महाराष्ट्रात 187 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर 12 जणांचा मृत्यु


मुंबई : महाराष्ट्रात काल दिवसभरात कोरोनाच्या 187 नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1761 वर पोहोचला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, राज्यात काल दिवसभरात 17 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. काल झालेल्या मृत्यूपैकी 12 जण मुंबईत, 2 पुण्यात तर सातारा, धुळे, मालेगाव येथील प्रत्येकी 1 जण आहे. राज्यात आतापर्यंत 127 जणांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत राज्यात पाठवण्यात आलेल्या 36 हजार 761 नमुन्यांपैकी 34 हजार 94 जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत; तर 1761 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 38 हजार 800 व्यक्ती होम क्वॉरंटाईन असून 4964 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 208 कोरोना बाधित रूग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

काल झालेल्या मृत्यूंपैकी ११ पुरूष तर ६ महिला आहेत. त्यातील 6 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 8 रुग्ण हे 40 ते 60 या वयोगटातील आहेत. तर तिघेजण 40 वर्षांखालील आहे. मृत्यूमुखी पडलेल्या 17 रुग्णांपैकी 16 रूग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग आहे.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात एकूण 4641 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 17 लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.

Leave a Comment