कोरोनापासून वाचण्यासाठी रॅकूनने सांगितली ‘हँड वॉश’ची योग्य पद्धत

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी वारंवार हात धुवावेत, असे आपण अनेकदा ऐकतो. आरोग्य अधिकारी देखील 20 सेंकदांपर्यंत अगदी व्यस्थित हात कसे धुवावे, हे सांगत असतात. मात्र सध्या रॅकून या प्राण्याचा हात धुवतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी आता प्राणी देखील हात धुवत आहेत.

आयएफएस अधिकारी प्रवीण कासवान यांनी रॅकूनचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, सर्वांनी आपले हात काळजीपुर्वक धुवावेत. रॅकूनचा दुसरा डेमो पाहण्यासाठी हा टीकटॉक व्हिडीओ काळजीपुर्वक पहा.

15 सेंकदांच्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रॅकून आधी पाण्याच्या भांड्यात हात बुडवतो त्यानंतर दुसऱ्या भांड्यातून साबण घेतो व हात व्यस्थित धुवतो.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, आतापर्यंत या व्हिडीओला 24 हजारांपेक्षा अधिक वेळा पाहण्यात आले आहे. नेटकऱ्यांना देखील हा व्हिडीओ आवडत असून, ते यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Leave a Comment