देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 6761वर; कम्युनिटी ट्रान्समिशन नाही


नवी दिल्ली : देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. याबाबत आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाचे एकूण 6761 रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामळे 206 लोकांनी आपला जीव गमावला आहे. देशभरात मागील 24 तासांत कोरोना संसर्ग झालेले 869 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 37 लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत आतापर्यंत देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात झपाट्याने वाढ झाली आहे.

पण अद्यापपर्यंत देशात कम्युनिटी ट्रान्समिशन झालेले नाही. तरी देखील आपल्याला खबरदारी म्हणून जागृत राहणे आवश्यक असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल एकूण 16,002 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या त्यात केवळ 0.2टक्के लोकांना कोरोना झाल्याचे समोर आले. देशभरात एकूण 146 ठिकाणी कोरोनाच्या चाचण्या होत आहेत. तर 67 प्रयोगशाळांना कोरोनाची चाचणी करण्यासाठीची परवानगी देण्यात आली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार कोराना व्हायरच्या पार्श्वभूमीवर भारताने आत्तापर्यंत 20,473 परदेशी नागरिकांना त्याच्या देशात परत पाठवण्यात आले आहे. तसेच परराज्यात असलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी सरकार विचार करुन निर्णय घईल.

केंद्रीय गृहमंत्रालातील अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे सरकारने जारी केलेल्या लॉकडाऊनच्या आदेशाचे राज्यांनी काटेकोरपणे पालन केले पाहिजे. कोणतीही सामाजिक, धार्मिक मिरवणूक किंवा मेळावा भरणार नाही याची काळजी घ्या. सोशल मीडियावर बारीक लक्ष ठेवा, जेणेकरून कोणतीही चुकीची माहिती त्याद्वारे परसरणार नाही, अशा सूचना गृहमंत्रालयाने राज्य सरकारने दिल्या आहेत.

देशातील प्रत्येक राज्यांचा विचार केल्यास सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात समोर आले आहेत. महाराष्ट्रात 1500हून अधिक लोकांना कोरोनाती लागण झाली आहे. तर 125 बरे झाले असून 97 जणांचा मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशात 363, अंदमान-निकोबार 11, अरुणाचल प्रदेश 1, आसाम 2, बिहार 60, चंदीगड 1, छत्तीसगड 10, दिल्ली 898, गोवा 7, गुजरात 241, हरियाणा169, हिमाचल प्रदेश 28, जम्मू-कश्मीर184, झारखंड 13, कर्नाटक 197, केरळ 357, लडाख 15, मध्य प्रदेश 259, मणिपूर 2, मिजोरम 1, ओडिसा 44, पाँडेचेरी 5, पंजाब 132, राजस्थान 463, तमिळनाडू 834, तेलंगणा 473, त्रिपुरा 1, उत्तराखंड 35, उत्तर प्रदेश 431 आणि पश्चिम बंगाल 116 कोरोनाचे रुग्ण समोर आले आहेत.

Leave a Comment