जगासाठी मोठा धोका, अमेरिकेच्या अणवस्त्र तळांपर्यंत पोहचला कोरोना

जगातील महासत्ता असलेल्या अमेरिकेत सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. येथे लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली असून, हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे आणखी एक मोठा धोका निर्माण झाला आहे.

रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या 41 राज्यांमधील 15 सैन्य ठिकाणांपर्यंत कोरोना व्हायरस पोहचला आहे. अमेरिकेच्या नौदल शक्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या चार अणुऊर्जा वाहक विमान जहाजांपर्यंत कोरोना पसरला आहे. अमेरिकेतील विमानवाहक यूएसएस थियोडोर रुजवेल्टच्या 4 हजार नौसैनिकांना गुआम येथे आणण्यात आले. येथे त्यांची चाचणी केली जात आहे. एअरक्राप्ट कॅरियरच्या कॅप्टनने मदत मागितल्यावर त्याला पदावरून हटवण्यात आले.

पेंटागननुसार, 3 हजार सैनिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. एका आठवड्यात ही संख्या दुप्पट झाली आहे. सैन्य ठिकाणांपर्यंत कोरोना पसरल्याने अमेरिकेने महत्त्वाच्या नसलेल्या हालचाली रोखल्या आहेत. याशिवाय सैन्य प्रशिक्षण आणि भरती देखील थांबविण्यात आली आहे.

कोरोना व्हायरसचा सर्वाधिक परिणाम अमेरिकेच्या नौदलावर झाला आहे. त्यानंतर लष्कर आणि एअरफोर्स या व्हायरसच्या विळख्यात आला.

सॅन डियागो, नोरफॉक, व्हर्जिनिया आणि जॅक्शनव्हिले, फ्लोरिडा, टेक्सास येथील नौदलाच्या ठिकाणांना सर्वाधिक धोका आहे. हवाई दलाच्या मेरीलँड येथील बेसवर कोरोनाग्रस्तांवर उपचार केला जात आहे.

जगभरातील शस्त्रांवर लक्ष ठेवणारी संस्था सीप्रीचे वैज्ञानिक हॅन्स क्रिस्टेंशन यांच्यानुसार, कोरोना व्हायरस आता अमेरिकेच्या अणवस्त्रांच्या तळापर्यंत पोहचला आहे. या तळांपर्यंत कोरोना पोहचणे जगासाठी धोकादायक आहे. यामुळे त्यांच्या सुरक्षेला देखील धोका निर्माण होऊ शकतो. दरम्यान, अमेरिकेकडे 3800 अणवस्त्र आहेत.

Leave a Comment