राज्याभोवती कोरोनाचा वाढता विळखा


मुंबई : कोरोनाचा विळखा राज्यात वाढताना दिसत असून राज्यात काल दिवसभरात 210 नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. परिणामी कोरोनाग्रस्तांची राज्यातील संख्या आता 1574 झाली आहे. तर, काल 13 जणांचा बळी गेला आहे. दिलायसादायक 188 लोक आजपर्यंत पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. मुंबई आणि पुणे जिल्हा हे राज्यात संवेदनशील झाली आहेत. मुंबईत सर्वाधिक 1008 रुग्णांची नोंद आहे. तर, त्याआखोखाल पुणे जिल्हात 254 रुग्णसंख्या आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाची रॅपीड टेस्ट घेण्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कोरोनामुळे राज्याची परिस्थितीत दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. देशातील लॉकडाऊन अजून तीन दिवसांनी संपणार आहे. पण, सध्याची परिस्थिती पाहता राज्यातील लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्या प्रकारचे संकेत दिले आहेत. आजपर्यंत 33093 जणांची कोरोना चाचणी झाली पैकी 1574 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 38927 लोकांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहेत. तर 4738 लोकांना सरकारी ठिकाणी क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

Leave a Comment