कोरोना : विविध देशात लॉकडाऊन, मृत्यूदर सारख्या शब्दांचे वेगवेगळे अर्थ

सध्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. दररोज हजारो नवीन रुग्ण या व्हायरसचा शिकार होत आहेत. भारतात या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. जगभरात 200 पेक्षा अधिक देशात या व्हायरसने हातपाय पसरले आहेत. त्यामुळे या महामारी संदर्भात अनेक देशात वेगवेगळी शब्दावली आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये कर्व प्लॅटनिंग, लॉकडाऊन, मास टेस्टिंग, केस लोड्स अशा शब्द आहेत, जे पहिल्यांदाच ऐकण्यात आले आहेत.

कंफर्म्ड केसेज –

चीनच्या वुहान शहरातून कोरोना व्हायरस जगभरात पसरला. त्यामुळे येथे असंख्य लोकांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र चीन आकडेवारी लपवत आहे. चीनने केवळ 82 हजार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले. चीनमध्ये प्रत्येकी 10 लाख व्यक्तींमागे 500 जणांची चाचणी करण्यात आली. जे इतर देशांच्या तुलनेत कमी आहे.

व्यापक चाचणी (वाइड-स्प्रेड टेस्टिंग) –

प्रती व्यक्ती चाचणीच्या बाबतीत अमेरिका अनेक देशांच्या मागे आहे. विशेषज्ञांच्या मते लोकांची संख्या जास्त असण्यापेक्षा, त्यांची तपासणी कधी व ते कोण होते, अधिक महत्त्वाचे आहे. दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, सिंगापूरसह संक्रमित देशांनी कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग वेगाने केले आहे.

मृत्यू दर (फॅटेलिटी रेट) –

इटली आणि स्पेनमध्ये मृत्यू दर सर्वाधिक आहे. तज्ञांच्या मते मृतांची आकडेवारी मोजण्यात देखील त्रुटी आहे. वुहानमध्ये 2,535 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. मात्र रिपोर्टनुसार तेथे हजारो जणांसाठी अंत्यसंस्काराच्या वस्तू खरेदी करण्यात आल्या.

इटली आणि फ्रान्समध्ये ज्या लोकांचा मृत्यू हॉस्पिटलमध्ये झाला अशाच लोकांनाच मोजण्यात आले. जर्मनीत काही रुग्णांना मोजण्यातच आले नाही. संक्रमितांची संख्या जेवढी कमी मोजली जाईल, तेवढाच मृत्यू दर कमी असेल. जर्मनीत मृत्यू दर केवळ 1 टक्के आहे.

उच्च स्थिती (द पीक) – 

जेव्हा महामारीचा ग्राफ खाली येतो, तेव्हा त्याची तुलना उच्च स्थितीशी होते. मात्र त्या उच्च स्थितीला व्यस्थितीत सादर केले जात नाही. इटलीमध्ये मार्चच्या सुरूवातीला मोजक्याच लोकांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र 21 मार्चला ही संख्या 6,500 झाली. संक्रमितांचा ग्राफ वरती जाण्याऐवजी सरळ राहीला अथवा खाली येऊ लागल्यास, त्याला सपाट ग्राफ (कर्व प्लॅटनिंग) म्हणतात.

लॉकडाऊन –

विकसित देशांसह जगभरातील 2 अब्ज लोक लॉकडाऊन आहेत. मात्र यासाठी स्टे एट होम, सोशल डिस्टेंसिंग सारखे शब्द देखील प्रचलित आहेत. देशानुसार लॉकडाऊनच्या नियमांमध्ये सुट आहे. याशिवाय बाहेर पडल्यावर दंडाची तरतूद देखील आहे.

Leave a Comment