अ‍ॅपल-गुगल मिळून तयार करणार कोरोना कॉन्टॅक्ट ट्रॅकिंग अ‍ॅप

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी टेक्नोलॉजीचा देखील मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. आता टेक्नोलॉजी क्षेत्रातील दोन मोठ्या कंपन्या अ‍ॅपल आणि गुगलने हातमिळवणी केली असून, या दोन्ही कंपन्या मिळून ब्लूटूथवर आधारित कोरोना व्हायरस ट्रॅकिंग अ‍ॅप तयार करणार आहे. याद्वारे युजर्स कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्याची माहिती मिळेल.

अ‍ॅपल आणि गुगलनुसार, दोन्ही कंपन्या मिळून असा पर्याय तयार करणारे आहेत, जो अ‍ॅप्लिकेशन प्रोग्रामिंग (एपीआयएस) आणि ऑपरेटिंग सिस्टम लेव्हल टेक्नोलॉजीवर आधारित कॉन्टॅक्ट ट्रॅकिंगसाठी मदत करेल. दोन टप्प्यात या पर्यायाची अंमलबजावणी करण्याचा विचार असून, सोबतच युजर्सच्या प्रायव्हेसीची देखील काळजी घेतली जाईल.

एपीआयएस हे आयओएस आणि अँड्राईडला एकमेकांना माहिती शेअर करण्यास मदत करेल व त्याचा उपयोग करता येईल. हे अ‍ॅप अ‍ॅपलचे अ‍ॅप स्टोर आणि गुगलच्या प्ले स्टोरवरून लाँच झाल्यानंतर उपलब्ध असेल.

जेव्हाही दोन व्यक्ती एकमेंकाच्या संपर्कात येतील या अ‍ॅपद्वारे त्यांचे फोन आयडेंटिफिकेशन की (identification key) एकमेकांना मिळतील. जर दोन्ही व्यक्तींपैकी एक व्यक्ती कोरोनाग्रस्त असल्यास दुसऱ्या व्यक्तीला फोनच्या माध्यमातून माहिती मिळेल. कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आल्यास या अ‍ॅप्लिकेशनद्वारे माहिती मिळेल. जेणेकरून चाचणी करायची की सेल्फ क्वारंटाईन राहायचे ठरवू शकतील. या सर्व घटनेमध्ये कोणत्याही युजर्सचे नाव समोर येणार नाही. यासाठी युजर्सच्या प्रायव्हेसीची विशेष काळजी घेतली जाणार आहे.

Leave a Comment