म्हणून विव रिचर्ड वापरत नसे हेल्मेट


फोटो साभार इकोनॉमिक टाईम्स
वेस्ट इंडीजचा तडाखेबंद फलंदाज विव्हियन रिचर्ड्स जगातील आक्रमक फलंदाजांपैकी एक फलंदाज आहे. पण त्याला कधीही मैदानावर हेल्मेट घालून खेळताना पाहिले गेलेले नाही. त्याला हेल्मेट आवडत नव्हते हे खरेच पण हेल्मेट न घालण्यामागे आणखीही एक कारण होते त्याचा खुलासा विव्हियनने ऑस्ट्रेलियाचा माजी ऑलराउंडर शेन वॉटसन याच्याशी बोलताना एका मुलाखतीत केला होता.

विव्ह म्हणाला, क्रिकेट बद्दल मला इतकी ओढ आणि प्रेम होते की खेळताना वेस्ट इंडीजसाठी मैदानावर मरण आले असते तरी त्यासाठी माझी तयारी होती. त्यासाठी बिनधास्त खेळणाऱ्या खेळाडूंकडून मी प्रेरणा घेत असे. फॉर्म्युला वन रेस मधले ड्रायव्हर बघा. त्यापेक्षा अधिक धोकादायक काय असू शकते? त्यावर शेन म्हणाला होता ताशी १५० मैल वेगाने येणारा जोरदार चेंडू विना हेल्मेट खेळणे तितकेच धोकादायक आहे. मात्र विव्हियनने त्यावर काही उत्तर दिले नाही.

विव्हियन रिचर्ड्सने त्याच्या कारकीर्दीत १२१ कसोटी मध्ये ८५४० धावा काढल्या असून त्यात २४ शतके आणि ४५ अर्धशतके आहेत. त्याने १९७ वन डे मध्ये ६७२१ धावा काढल्या आहेत आणि त्याचा सर्वोत्तम स्कोर आहे नाबाद १८९.

Leave a Comment