करोनाने खाल्ली ट्रम्प यांची १ अब्ज डॉलर्स संपत्ती


फोटो साभार बिझिनेस इनसायडर
अमेरिकेचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर बडे उद्योजक असलेल्या डोनल्ड ट्रम्प यांची संपत्ती १ अब्ज डॉलर्सने ( ७६७१ कोटी रुपये) घटल्याचे फोर्ब्सच्या अहवालात म्हटले गेले आहे. त्यानुसार १ मार्च रोजी ट्रम्प यांची एकूण संपत्ती ३.१ अब्ज डॉलर्स होती ती १८ मार्च पर्यंत १ अब्ज डॉलर्सने कमी होऊन २.१ अब्ज डॉलर्सवर आली आहे. करोनाने हा दणका ट्रम्प याना दिला आहे.

वुहान मधून जगभरात फैलावलेल्या करोना कोविड १९ विषाणूने बहुतेक सर्व देशांची अर्थव्यवस्था खिळखिळी केली असून त्याचा फटका जगातील अनेक श्रीमंत उद्योजक, व्यावसायिकांना बसला आहे. ट्रम्प हेही एक बिझिनेसमन आहेत आणि त्यानाही करोनाने अपवाद केलेले नाही. या काळात शेअर मार्केट कोसळल्याने जगभरातील २०९५ अब्जाधीशांपैकी १०६२ आता अब्जाधीश राहिलेले नाहीत. भारताचा विचार करायचा तर रिलायंसचे मुकेश अंबानी, शिव नाडर, कोटक, हिंदुजा ब्रदर्स यांच्यासह तमाम उद्योजकांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे.

भारतातील डी मार्टचे राधाकिशन दमाणी हे एकमेव असे बिझिनेसमन आहेत ज्यांच्या संपत्तीत या काळात वाढ झाली आहे. मुकेश अंबानी यांची संपत्ती १/३ घटली असून शिव नाडर, उदय कोटक, गौतम अडाणी हे जगातील प्रथम १०० अब्जाधीश यादीतून बाहेर पडले आहेत.

Leave a Comment