ज्यांच्या अंगावर थुंकले आता जीव वाचवण्यासाठी त्यांच्याकडेच विनवणी करत आहेत तबलिगी


नवी दिल्ली – जगभरातील अनेक देशांसह भारतात देखील जीवघेण्या कोरोनाने थैमान घातले असून सध्या देशात लॉकडाउनची स्थिती असतानाही कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तीन तबलिगींना उत्तर प्रदेशमधील कानपुर जिल्ह्यात आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांनी सुरूवातीला डॉक्टरांना उपचारासाठी कोणतेही सहकार्य केले नसल्याची माहिती समोर आली होती. त्याचबरोबर त्यांच्या उपचारासाठी त्या ठिकाणी असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यासोबत त्यांनी गैरवर्तनही केले होते. डॉक्टराच्या अंगावर ते तबलिगी थुंकल्याचा संतापजनक प्रकार घडला होता. परंतु आता ते डॉक्टरांकडे आपले प्राण वाचवण्याची विनंती करत असल्याचे समोर आले आहे.

आयसोलेशनमध्ये असलेल्या कोरोनाग्रस्त तबलिगींची प्रकृती बिघडत असल्याचे समोर आले. त्या तिघांनी त्यावेळी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडे आपले प्राण वाचवण्याची विनंती केली. दरम्यान सीएमओ अशोक शुक्ला यांच्याशी या प्रकरणी काही माध्यमांनी संवाद साधला. ते तिघे सुरूवातीला वेळेवर औषधांचे सेवन करत नव्हते. ते वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही सहकार्य करत नव्हते. परंतु ते आता डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यानी सांगितलेल्या सर्व गोष्टी करत आहे. त्यांचे रडणे, विनंती करणे या सर्व मानसिक बाबी आहेत. ज्यावेळी कोणी जास्त घाबरते, त्यावेळी ते अशा प्रकारे वर्तन करतात, असेही ते म्हणाले.

Leave a Comment