महिला पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने असा केला कोरोना नियंत्रित

सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. काही देशांमध्ये या व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, तर काही देशांनी मात्र या व्हायरसवर नियंत्रण मिळवले आहे. न्यूझीलंड देखील या पैकीच एक देश असून, न्यूझीलंडमध्ये मागील 4 दिवसात कोरोनाग्रस्तांचे प्रमाण खूप कमी झाले आहे.

न्यूझीलंडमध्ये जवळपास हजार जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. मात्र यातील शेकडो जण बरे झाले आहेत. न्यूझीलंडमधील 15 दिवसांचा लॉकडाऊनचा काळ समाप्त झाला असून, याचा चांगला परिणाम पाहण्यास मिळाला.

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डेन म्हणाल्या की, हळहळू परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आपली योजना काम करत आहे. इतर देशांमध्ये कोरोना व्हायरस थोडाफार नियंत्रणात आल्यावर लॉकडाऊन हटवण्याची आणि नियमांमध्ये सुट देण्यात येत आहे. मात्र न्यूझीलंड असे काहीही करताना दिसत नाही.

जेसिंडा ऑर्डेन म्हणाल्या की, सीमेवर प्रतिबंध अधिक सख्त करण्यात येत आहेत. जे कोणी बाहेरून देशात प्रवेश करेल, त्यांना घराऐवजी सरकारी फॅसिलिटीमध्ये क्वारंटाईन केले जाईल. हा नियम केवळ न्यूझीलंडच्या नागरिकांसाठी असेल. परदेशी नागरिकांसाठी प्रवेश 20 मार्चपासूनच बंद आहे.

त्या म्हणाल्या की, 15 दिवसांचा लॉकडाऊन पाहून मला वाटते की न्यूझीलंडच्या लोकांनी खूप मोठी कामगिरी केली आहे. तुम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतला व एकमेंकाना सुरक्षित केले. तुम्ही अनेकांचे प्राण वाचवले. मात्र अद्याप मॅरोथॉन बाकी आहे.

भौगोलिक स्थिती आणि वेळेवर निर्णय हे न्यूझीलंडकडे कोरोनाशी लढण्यासाठी प्रमुख शस्त्र आहे. 28 फेब्रुवारीला न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता.

ओटेगा यूनिवर्सिटीच्या सार्वजिनक आरोग्य विभागाचे प्राध्यापक मायकल बेकर म्हणाले की, मला वाटती की आमच्याकडे विचार करण्यासाठी पर्याप्त वेळ होता. चीनच्या उदाहरणांवरून देखील आम्ही बरचं काही शिकलो.

ऑकलँड यूनिवर्सिटीचे मायक्रोबायोलॉजिस्ट सियॉक्सी वायल्स म्हणाले की, न्यूझीलंड एक आयलंड आहे व ते इतरांपासून थोडे विभागलेले आहे. इतर देशांच्या तुलनेत न्यूझीलंडमध्ये खूप कमी प्लाइट्स येतात.

न्यूझीलंड एक आयलंड असल्याने खूप फायदेशीर ठरल्याचे आर्डेन देखील म्हणाल्या. मात्र न्यूझीलंडच्या वैज्ञानिकांचा दृष्टीकोन आणि चांगल्या नेतृत्वाने मिळून या व्हायरसवर नियंत्रण मिळवले. न्यूझीलंड मोठ्या प्रमाणात चाचणी देखील केली.

आर्डेन यांनी 14 मार्चलाच स्पष्ट केले होते की, देशात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला 2 आठवड्यांसाठी सेल्फ क्वारंटाईन करावे लागेल. त्यावेळी इतर देशांमध्ये कोणतेच नियम लागू नव्हते. अशा वेळी न्यूझीलंडमध्ये बोटांवर मोजण्या इतकेच रुग्ण होते. यानंतर 19 मार्चला परदेशी व्यक्तींना देशात बंदी आणि 23 मार्चला लॉकडाऊनची घोषणा केली. न्यूझीलंडमध्ये जास्त आयसीयू बेड नाहीत. मात्र आर्डेन यांनी वेगाने योग्य ती पावले उचलल्याने न्यूझीलंडने कोरोनावर नियंत्रण मिळवले.

Leave a Comment