कोरोना : ईराणमध्ये रमजान महिन्यातील धार्मिक सभांवर येऊ शकते बंदी

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून, यामुळे जगभरातील मोठमोठे इव्हेंट, क्रिडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व धार्मिक स्थळे देखील बंद करण्यात आली आहेत. आता ईराणमध्ये देखील पवित्र रमजान महिन्यात सामूहिक धार्मिक आयोजनावर बंदी घातली जाऊ शकते. ईराणचे सर्वोच्च नते अयोतोल्लाह अली खमेनेई यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत.

इमाम महदी यांच्या जन्मदिवसानिमित्त टिव्हीवर संदेश देताना खमेनेई म्हणाले की, कोरोना व्हायरसमुळे रोजा ठेवण्याच्या या पवित्र महिन्यात मस्जिदमध्ये नमाज आणि उपदेश सभांवर परिणाम होईल.

ते म्हणाले की, अल्लाहच्या प्रार्थनेसाठी होणाऱ्या सभा आणि यात देण्यात येणारे उपदेश ऐकणे महत्त्वाचे आहे. मात्र व्हायरसमुळे सभा झाल्या नाहीतरी देखील घरात असताना प्रार्थना करावी.

Leave a Comment