सोशल डिस्टेंसिंग असावे तर असे, थेट झाडावर बांधले घर

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी सर्वोत्तम उपाय सोशल डिस्टेंसिंग आहे. लोक गर्दी टाळण्यासाठी बाहेर पडत नाहीत. अत्यावश्यक वस्तूंसाठी बाहेर पडले तरी रांगेत विशिष्ट अंतर ठेवत उभे राहताना दिसत आहे. उत्तर प्रदेशमध्ये मात्र एका व्यक्तीने सोशल डिस्टेंसिंगचा पुढचा टप्पा गाठला आहे.

हापुड जिल्ह्यातील एका व्यक्तीने चक्क झाडावरच घर बांधले आहे. या व्यक्तीचे नाव मुकुल त्यागी असून, ते वकील आहेत. त्यांनी आपल्या घराजवळील झाडावर शानदार घर बनवले आहे.

त्यांनी याविषयी सांगितले की, डॉक्टरांनी या महामारीपासून वाचण्याचा एकमेव पर्याय सोशल डिस्टेंसिंग सांगितला आहे. त्यामुळेच त्यांनी एकांतात राहण्याचा निर्णय घेतला. ते याचा आनंद देखील घेत आहेत.

मुकुल त्यागी येथे बसून पुस्तक वाचतात. त्यांच्या मते, त्यांना येथे बसून निसर्गाच्या जवळ असल्यासारखे वाटते. त्यांनी यासाठी झाडावर खाटेसाठी चौकोनी वस्तू टाकली आहे. ज्यावर ते आरामशीर बसू शकतात. खाली एक झोका देखील बांधला आहे.

Leave a Comment