कोरोनाला रोखण्यासाठी देशातील युवा शक्तीने तयार केलेत खास अ‍ॅप्स

कोरोना व्हायरस महामारीला रोखण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहे. भारतीय युवा शक्ती देखील नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध लावत, या व्हायरसवर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत. आयआयटी, एनआयटी, आयआयएससीच्या विद्यार्थी, संशोधक ते वैज्ञानिक यांनी स्वस्त पोर्टेबल व्हेंटिलेटर, रोबो, ड्रोन, चाचणी किट, मास्क, सॅनिटायझर्स, फेसशीट्स, हातमोजे आणि पीपीई किट तयार करुन भारत सरकारला दिली आहे. वेगवेगळ्या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी असे अ‍ॅप तयार केले आहेत, जे कोरोनाग्रस्तांची माहिती त्वरित देतील.

आयआयटी दिल्लीच्या विद्यार्थ्यांनी असे अ‍ॅप बनवले आहे, जे कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती देईल आयआयटी दिल्लीच्या डिपार्टमेंट ऑफ डिझाईनच्या पीएचडी विद्यार्थी अरशद नासरनुसार, हे अ‍ॅप ब्लूटूथचा वापर करून सर्व व्यक्तींना ट्रॅक करेल व अलर्ट करेल.

याच प्रमाणे आयआयटी रोपडच्या बीटेकचा विद्यार्थी साहिल वर्माने ‘संपर्क ओ मीटर’ नावाचे अ‍ॅप तयार केले आहे. जे नकाशाच्या माध्यमातून कोरोना व्हायरसचा प्रसार अधिक असलेल्या क्षेत्राची माहिती देते. आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांनी देखील क्वांरटीन नावाचे अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपद्वारे कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेता येईल.

आयआयटी रुडकीचे सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे प्राध्यापक कमल जैन यांनी असे अ‍ॅप तयार केले आहे कोरोनाग्रस्तांपासून ते आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आलेल्या व्यक्तीने नियमांचे उल्लंघन केल्यास सतर्क करते.

आयआयएससी बंगळुरूच्या टीमने ‘गो कोरोना गो’ नावाचे अ‍ॅप विकसित केले आहे. या अ‍ॅपद्वारे देखील कोरोनाग्रस्त अथवा संशयित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची ओळख करेल. हे अ‍ॅप जीपीएस आणि ब्लूटूथवर काम करते.

आयआयडी रोपडचे प्राध्यापक धीरज कुमार महाजन यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी एक टेंट तयार केला आहे. या टेंटमध्ये रुग्णाला ठेवले जाईल. ज्यामुळे व्हायरस बाहेरच येणार नाही. जी हवा या टेंटमधून बाहेर येईल, त्यावर प्रयोग केलेला असेल.

Leave a Comment