‘लॉकडाऊन हटवताना भारताने घ्यावी विशेष काळजी’, डब्ल्यूएचओचा सल्ला

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने देशव्यापी लॉकडाऊनचा निर्णय 14 एप्रिलला समाप्त होणार आहे. मात्र सरकार लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची देखील शक्यता आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष दूत डेव्हिड नबारो यांनी भारताला लॉकडाऊन हटविण्याविषयी अधिक सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

डेव्हिड नबारो एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, भारतातील लॉकडाऊन संपवताना अत्यंत निवडक आणि काळजीपुर्वक निर्णय घेण्यात यावा. हॉटस्पॉट भागातील लोक नवीन जागेवर जाणार नाहीत व आजार पसरवणार नाहीत, असे उपाय करण्याची गरज आहे. कोणत्याही देशाला अधिक काळ लॉकडाऊन नको असतो, मात्र अपरिहार्य नसावे.

नबारो यांनी बेन्नेट यूनिवर्सिटीकडून आयोजित कोव्हिड-19 वरील जागतिक आरोग्य संघटनेचे दूत म्हणून भाग घेतला होता. यावेळी त्यांनी भारताने लवकर घेतलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयाचे स्वागत केले.

ते म्हणाले की, सध्याच्या वेळेचा उपयोग क्षमतांची निर्मिती आणि लोकांना संभावित संकटाविषयी सुचना देण्यास केला जाऊ शकतो. याशिवाय कोरोनावरील लस बनवणे सोपे नाही व  एवढ्या कमी कालावधीमध्ये जगभरातील लोकांसाठी मोठ्या प्रमाणात लस बनवणे देखील शक्य नाही.

Leave a Comment