कोरोना : देशातील पहिले रिमोट हेल्थ मॉनिटरिंग सिस्टम तयार, घरून घेता येणार उपचार

उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीएचईएल) बंगळुरूने मिळून देशातील पहिले रिमोट हेल्थ मॉनिटरिंग सिस्टम तयारी केली आहे. याच्या माध्यमातून दुर्गम भागातील कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या वायटल पॅरामीटर्स कोठूनही शोधता येतील.

एम्सचे संचालक प्राध्यापक रवि कांत यांनी सांगितले की, पीपीई किट कमी असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना संसर्ग होण्याचा धोका अधिक होता. त्यामुळे एम्सने बीएचईएलशी संपर्क साधला.

त्यांनी सांगितले की, एक अशी डिजिटल वैद्यकीय प्रणाली तयार करण्यात आली आहे, ज्याच्या माध्यमातून एम्समध्ये बसून रुग्ण घरी असताना देखील त्याच्या शरीराचे तापमान आणि रक्तातील ऑक्सिजनची मात्रा आणि श्वासांच्या गतीवर लक्ष ठेवता येईल. यासाठी बीएचईएलने एक अशी प्रणाली तयार केली आहे जी वैद्यकीय क्षेत्रात भारतासाठी खूप उपयुक्त ठरेल.

रविकांत यांनी सांगितले की, यासोबतच एक वेबसाईट आणि मोबाईल अ‍ॅपची देखील निर्मिती करण्यात आली आहे. याद्वारे रुग्ण घरी बसूनचे एम्सचे डॉक्टरांना आपल्या आजाराविषयी माहिती देऊ शकतील. त्यानंतर डॉक्टर आजाराची लक्षण विचार घेऊन रुग्णाला सल्ला देतील. जर रुग्ण कोरोना संशयित आहे, असे वाटल्यास त्याला संस्थेद्वारे मॉनिटरिंग किट दिले जाईल.

या किटचा वापर करून रुग्ण घरूनच डॉक्टरांकडून सल्ला घेऊ शकेल. रुग्णाचे वायटल पॅरामीटर्स लोकेशनसोबत इंटरनेटद्वारे विना अडथळा एम्सला मिळतील. रुग्णाला हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज आहे की नाही, याविषयी देखील अलर्ट केले जाईल.

Leave a Comment