कोरोना : सफाई कामगारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी केला फुलांचा वर्षाव

कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी आरोग्य आणि पोलीस कर्मचारी दिवस-रात्र काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त सफाई कर्मचारी देखील या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी मेहनत घेत आहेत. अशाच सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतूक करण्यासाठी हरियाणातील अंबाली येथील स्थानिक नागरिकांना या कर्मचाऱ्यांना पुष्पहार घालून, त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला.

नादी मोहल्ला येथील स्थानिकांनी आपल्या छतांवरून या कर्मचाऱ्यांवर फुलांचा वर्षाव केला, तर काही जणांना त्यांच्या कामासाठी टाळ्या वाजवत त्यांना माळा घातल्या.

सफाई कर्मचारी असलेले बजरंग म्हणाले की, हे सर्व पाहून मी खूप आनंदी आहे. मी लोकांना केवळ एकच सल्ला देईल की सर्वांनी लॉकडाऊनच्या काळात आपआपल्या घरात राहावे, जेणकरून आपण कोरोना व्हायरसवर मात करू शकू.

स्थानिक नागरिक असलेले देविंदर शर्मा म्हणाले की, त्यांचे धैर्य वाढवण्यासाठी आपण त्यांचा आदर केला पाहिजे. त्यांना यामुळे नक्कीच बरे वाटेल. ते आमच्यासाठी कुटुंबासारखे आहेत. कोरोना व्हायरसच्या आधीपासून ते येथे काम करत आहेत. सरकारने देखील त्यांना भविष्यात प्रोत्साहित करावे, अशी आमची इच्छा आहे.

Leave a Comment