वैज्ञानिकांनी शोधले शरीरातील ते टार्गेट जेथे कोरोनाचे औषध ठरणार परिणामकारक

अमेरिकेतील कॉर्नेल यूनिवर्सिटीच्या वैज्ञानिकांनी त्या टार्गेटचा शोध घेतला आहे, जेथे कोरोना व्हायरसवरील औषध सर्वाधिक परिणामकारक ठरेल. कोरोनावरील उपचारासाठी हे मोठे यश आहे. याच्या मदतीने शरीरात जेथे व्हायरस चिकटलेला असेल, तेथे हे औषध थेट मारा करेल.

सर्वात प्रथम वैज्ञानिकांनी कोव्हिड-19 ची सरंचना आणि स्वरूप सार्स आणि मर्सच्या संरचना आणि स्वरूपाशी जुळवले. वैज्ञानिकांचे मुख्य लक्ष्य व्हायरसच्या बाहेरील काटेरी थरावर होते. हे स्पाइन प्रोटीन शरीरच्या पेशींमध्ये जाऊन चिटकते. त्यानंतर पेशींना संक्रमित करून व्हायरस निर्माण करते.

कोव्हिड-19 व्हायरसची संरचना 2002 साली पसरलेल्या सार्स महामारी व्हायरसशी 93 टक्के मिळती जुळती आहे. म्हणजेच कोव्हिड-19 व्हायरसचे जीनोम सिक्वेंस सार्स व्हायरसशी मिळते जुळते आहेत.

कॉर्नेल यूनिवर्सिटीची टीम हा व्हायरस शरीराच्या पेशींमध्ये कसा घुसतो, याचा अभ्यास करत आहे. व्हायरस शरीरातील पेशींना चिटकणे लांबलचक प्रक्रिया आहे. यात, व्हायरस प्रथम पाहतो की त्याने योग्य पेशी निवडल्या आहेत की नाही. यासाठी पेशीच्या आसपास असलेले रसायने या पेशी योग्य आहेत की नाही ते सांगतात.

पेशी योग्य आहेत की नाही याची माहिती, सर्वात प्रथम कोरोना व्हायरसच्या बाहेरील काटेरी थराला समजते. त्यानंतर हा थर पेशींना जाऊन चिटकतो. या काटेरी थराला प्यूजन पेप्टाइड म्हटले जाते. हे पेशींना तोडण्यास सुरूवात करते. व्हायरस पेशींमध्ये जीनोम सिक्वेंस पाठवत नवीन व्हायरसची निर्मिती करण्यास सुरूवात करते.

वैज्ञानिकांनी शोध लावला आहे की, कॅल्शियम आयन व्हायरसच्या काटेरी थरासोबत संपर्क बनवण्यास मदत करते. हेच व्हायरसच्या बाहेरील थराच्या संरचनेला बदलते. हीच गोष्ट मर्स आणि सार्समध्ये पाहण्यास मिळाली होती.

वैज्ञानिकांनी जर या व्हायरसच्या काटेरी थराची रासायनिक प्रक्रिया थांबवली तर व्हायरस पेशींशी संपर्क करू शकणार नाही व काही दिवसातच लसीद्वारे नष्ट होईल.

Leave a Comment