जगभऱात 16 लाखांच्यावर कोरोनाग्रस्त तर 95 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यु


नवी दिल्ली : जगभरात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आज 16 लाख 4 हजारापेक्षा जास्त झाला आहे. तर कोरोनामुळे 95 हजार 506 पेक्षा जास्त लोकांनी आपला जीव गमावला आहे. दिलासादायक बाब म्हणजे तीन लाख 57 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर अजून जवळपास 11लाख 51 हजार लोक कोरोनाबाधित आहेत. त्यातील चार टक्के म्हणजे 49 हजार 151 रुग्ण गंभीर आहेत. भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा 6000च्या पार गेला आहे. तर कोरोनोमुळे देशात 199 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 477 लोक कोरोनामुक्त देखील झाले आहेत. भारतात महाराष्ट्रात सर्वाधिक 1135 कोरोनाग्रस्त आहेत.

कोरोनाचा अमेरिकेत अक्षरशः हाहाकार सुरुच आहे. अमेरिकेत गेल्या 7 दिवसात कोरोनाचे तब्बल 10 हजार 601 बळी गेले आहेत. कोरोनामुळे 1 ते 2 लाख बळी जातील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण आता अमेरिकेत 60 हजार बळी जातील असा नवा अंदाज टास्क फोर्सने व्यक्त केला आहे. सलग तिसऱ्या दिवशी अमेरिकेत 1900पेक्षा जास्त बळी गेले आहेत. अमेरिकेत कोरोनाने गेल्या चोवीस तासात 1900 बळी गेले आहेत.

अमेरिकेत 80 दिवसांपूर्वी पहिला रुग्ण आढळला होता, तिथे आता तिथे मृतांचा आकडा 16 हजार 691वर पोहोचला आहे. अमेरिकेत रुग्णांची संख्या चार लाख 68 हजारावर पोहोचली आहे. न्यूयॉर्क प्रांतात काल 799बळी, तिथे रुग्णांची संख्या 1लाख 62हजार तर एकूण मृतांचा आकडा 7068 झाला आहे. त्या खालोखाल न्यू जर्सीत 1700, मिशिगनमध्ये 1076, लुझियाना 702, कॅलिफोर्निया 559आणि वॉशिंग्टनमध्ये 455लोकांचा बळी या रोगाने घेतला आहे. गेल्या 7 दिवसात अमेरिकेतील तब्बल 10 हजार 601लोकांनी आपला जीव गमावला आहे.

दूसरीकडे स्पेनमध्ये गेल्या चोवीस तासात 655 लोकांनी आपले प्राण गमावले आहे. तेथील मृतांचा आकडा 15 हजार 447 झाला आहे. गेल्या नऊ दिवसात स्पेनमध्ये 6 हजार 983 लोकांनी आपला जीव गमावला आहे. तसेच इटलीमध्ये काल दिवसभरात कोरोनाने 610 लोकांचा बळी घेतला. आता इटलीतील एकूण बळींची संख्या 18हजार 279 आहे. इटलीतील रुग्णांची संख्या काल 4 हजार 204 ने वाढली, इटलीत आता जवळपास 1 लाख 44 हजार रुग्ण आहेत, तर 9 मार्चपासून इटलीत लॉकडाऊन आहे.

फ्रान्सने काल दिवसभरात 1341 लोक गमावले. तिथे आत्तापर्यंत 12हजार 210 बळी, एकूण रुग्ण 1 लाख 18 हजार सापडले आहे. जर्मनीत काल 258 बळी गेले, एकूण बळींची संख्या 2607 पोहोचला आहे. इंग्लंडमध्ये काल कोरोनाने तिथे 881 लोकांचा जीव घेतला, तिथला बळीचा आकडा 7978 वर पोहोचला आहे. इराणने काल 4 हजाराचा आकडा ओलांडला. बळींच्या संख्येत काल 117ची भर, एकूण 4110 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर पीडितांची संख्या 66220 इतकी आहे. कोरोनाने हॉलंडमध्ये काल 148 बळी घेतले तिथे एकूण 2396 लोक दगावले आहेत. बेल्जियममध्ये काल 283 मृत्यूमुखी पडले, एकूण बळींचा आकडा 2523 एवढा आहे.

स्वित्झर्लंडमध्ये 948, स्वीडनमध्ये 793, ब्राझील 954, पोर्तुगाल 409, कॅनडात 509, इंडोनेशिया 280, टर्की 908 तर इस्रायलमध्ये 86 बळी गेले आहेत. दक्षिण कोरियात काल 4 मृतांची भर पडली, एकूण मृतांचा आकडा 204 एवढा आहे. आपला शेजारी पाकिस्तानात रुग्णांची संख्या 4489 वर पोहोचली आहे, तिथे 65 लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. गेल्या 24 तासात जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये 85010 तर बळींच्या आकड्यात 7234 ची भर पडली.

Leave a Comment