कोरोना : टीक-टॉकवर पाहिलेले घरगुती उपचार केल्याने 10 जण पडले आजारी

कोरोना व्हायरस संदर्भात सोशल मीडियावर चुकीची माहिती देणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे लोक घरगुती उपचार करत आहेत. मात्र ही खोटी माहिती अनेकदा जीवघेणी देखील ठरू शकते. आंध्र प्रदेशच्या चित्तूर येथील असाच एक प्रकार समोर आला आहे.

चित्तूरच्या अलापल्ली गावातील दोन कुटुंबांनी एक टीकटॉक व्हिडीओ पाहिला. या व्हिडीओमध्ये दावा करण्यात आला होता की, धोतऱ्याचे फळ खाल्ल्याने कोरोनापासून बचाव होतो. दोन कुटुंबांनी याचे सेवन केल्याने, त्यांना चांगलेच महागात पडले. या घरगुती उपचारामुळे 10 सदस्यांची तब्येत बिघडली व सर्वांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. या कुटुंबाला वेळेवर उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले.

स्थानिक पोलीस व्हिडीओ बनवणाऱ्याचा शोध घेत आहेत. धोतऱ्याचे फळ खाल्ल्याने ह्रदयाचे ठोके वाढतात व शरीरावर पुरळ येतात.

तर दुसरीकडे गावकऱ्यांचे म्हणणे आहे की दोन्ही कुटुंबानी हे फळ 70 वर्षीय नागराजू आणि 40 वर्षीय लक्ष्मिम्मा यांच्या सांगण्यावरून खाल्ले. त्यानंतरच  हे सर्वजण आजारी पडले.

Leave a Comment