मोदींचे ट्रम्प यांनी मानले आभार; अमेरिका कधीच विसरणार नाही ही मदत


नवी दिल्ली – हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधावरची निर्यातबंदी भारताने माणुसकी दाखवत हटवली आहे. या औषधाची सध्या सर्वाधिक गरज अमेरिकेला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने निर्यातबंदी उठवल्यानंतर समाधान व्यक्त करत भारतीयांचे आणि भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धन्यवाद देत आभार मानले आहेत.

अमेरिका भारताने केलेली मदत कधीच विसरणार नसल्याचे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत. मित्रांचे सहकार्य अडचणीच्या काळात महत्त्वाचे असते. अमेरिकेला सध्या भारताची गरज होती आणि एक मित्र म्हणून भारताने अमेरिकेला मदत केली आहे. हे आम्ही कधीच विसरणार नसल्याचे ते म्हणाले आहेत. याआधी ट्रम्प यांनी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधाच्या पुरवठयावरुन भारताला धमकी दिली होती. त्यानंतर भारताने 24 औषधांवरची निर्यातबंदी उठवली. अमेरिकेच्या दबावानंतर ही निर्यातबंदी उठवल्याची चर्चा देखील सुरू आहे.

पॅरासिटामॉल आणि हायड्रोक्सीक्लोरोक्विनचा परवाना भारताच्या क्षमतांवर अवलंबून असणार्‍या सर्व शेजारी देशांना योग्य प्रमाणात देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आम्ही ही आवश्यक औषधे कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेल्या काही राष्ट्रांना पुरवत असल्याचे भारत सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Comment