सलाम ! ड्यूटीवरून परतल्यानंतर ही पोलीस कर्मचारी गरजूंसाठी बनवते मास्क

कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी आरोग्य आणि पोलीस कर्मचारी खरे हिरो बनून मदत करत आहेत. हे कर्मचारी दिवस-रात्र जनतेसाठी काम करत आहेत. अशाच एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष कामासाठी या महिला पोलीस कर्मचारीचे कौतूक होत आहे.

सृष्टी स्त्रोतिया या महिला पोलीस कर्मचारी दिवसभर आपली ड्यूटी पुर्णकरून आल्यानंतर सायंकाळी गरजूंसाठी स्वतः मास्क शिवतात व त्यांना देतात.

अनिल बिसवाल नावाच्या ट्विटर युजरने या महिला कॉन्स्टेबलचे फोटो शेअर केले आहेत. ट्विट शेअर करत त्यांनी लिहिले की, या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव सृष्टी स्त्रोतिया आहे. सृष्टी मध्य प्रदेशच्या सुरई ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत व त्या आपल्या ड्युटीनंतर गरजू लोकांसाठी मास्क तयार करतात. ज्यांच्याकडे मास्क नाही, अशांसाठी त्या मास्क तयार करत आहेत.

सृष्टी यांच्यासोबत काम करणारे इतर कर्मचारी देखील त्यांच्या या कार्यामुळे आनंदी असून, ते देखील मदत करत आहेत. सोशल मीडियावर देखील युजर्स त्यांच्या कामाचे कौतूक करत आहेत.

Leave a Comment