कोरोना : या अभिनेत्याने आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी खुले केले स्वतःचे हॉटेल

कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी बॉलिवूडचे कलाकार लोकांची मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. आता अभिनेता सोनू सूद देखील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी पुढे आला आहे. सोनू सूदने आपले जुहू येथील हॉटेल आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी खुले केले आहे. या हॉटेलमध्ये आरोग्य कर्मचारी राहू शकतात. सोनू सूदच्या या मदतीसाठी त्याचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

सोनू सूद म्हणाला की, मी डॉक्टर आणि नर्ससाठी काही करू शकत आहे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.

सोनू सूदने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, या कठीण काळात आपल्याला राष्ट्रीय हिरोंचे समर्थन करण्याची गरज आहे. ते रात्र-दिवस न थकता आपल्यासाठी काम करत आहेत. यामुळे मी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी जुहू येथील आपले हॉटेल खुले करत आहेत. या हिरोंद्वारे करण्यात येणाऱ्या कामासाठी आपण त्यांच्यासाठी एवढे तरी करू शकतो. या स्थितीत आपण सर्व एकत्र आहोत. चला पुढे येऊया व त्यांना साथ देऊया.

सोनू सूदच्या आधी अभिनेता शाहरूख खानने देखील आपले चार मजली ऑफिस क्वांराईन वॉर्ड बनविण्याची परवानगी दिली होती.

Leave a Comment