‘कोरोनाचे राजकारण करू नका’, डब्ल्यूएचओचे ट्रम्प यांना उत्तर

जागतिक आरोग्य संघटनेने जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सर्व देशांनी एकजूट राहण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पने या जागतिक संघटनेवर टीका केली होती. त्यानंतर आता डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रॉस गेब्रेयेसस यांनी या महामारीचे राजकरण करू नये असे म्हटले आहे.

गेब्रेयेसस म्हणाले की, कोव्हिड-19 वर राजकारण करून आपण एकमेकांच्या उणीवा काढण्यात वेळ घालवायला नको. हे आगीशी खेळण्यासारखे आहे. आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

ट्रम्प यांनी डब्ल्यूएचओला अमेरिकेकडून मिळणारा फंड थांबविण्याची धमकी दिली होती. यावर संघटनेचे प्रमुख म्हणाले की, महामारीच्या राजकारणाने मतभेद वाढतील. कृपया, कोरोनावर होणाऱ्या राजकारणाला क्वारंटाईन करून एकमेंकावर आरोप करण्यात वेळ घालवू नये.

ट्रम्प यांनी बुधवारी पुन्हा एकदा डब्ल्यूएचओवर चीनला केंद्रित ठेऊन काम करण्याचा आरोप केला आहे. सर्वांसाठी समान वागणूक हवी, मात्र असे दिसत नाही. अमेरिका डब्ल्यूएचओची फंडिग थांबवणार असल्याचे देखील ट्रम्प म्हणाले.

Leave a Comment