जाणून घ्या कोरोना चाचणी आणि रॅपिड अँटी बॉडी टेस्टमधील फरक


कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढत असल्याने कोरोनाग्रस्त किंवा संशयित रुग्णांना ओळखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रॅपिड टेस्ट (समूह तपासण्या) करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. आता त्यासाठी एका पोर्टेबल मशीनच्या सहाय्याने ज्याप्रमाणे आपण रक्तातील साखरेचे प्रमाण तपासतो त्याचप्रमाणे ही तपासणी केली जाईल. त्यानंतर संबंधितास कोरोनाची पुढील तपासणी करण्याची किंवा आयसोलेशन किंवा क्वारंटाईन करण्याची गरज आहे की नाही, हे देखील स्पष्ट होईल. दरम्यान कोरोना चाचणी आणि रॅपिड अँटी बॉडी टेस्टमधील फरक आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सध्याची कोरोनाची जी चाचणी केली जाते त्याला PCR (polymerase chain reaction) म्हणतात. त्यासाठी नाक आणि घशातील स्वॅब गरजेचे आहेत. त्याचा रिझल्ट येण्यासाठी पाच ते सहा तास लागतात.
तर केवळ 15 मिनिटात रॅपिड अँटी बॉडी टेस्ट रोगाचे निदान करते आणि त्यासाठी फक्त रक्ताचे नमुने तपासावे लागतात.

का महत्त्वाची आहे रॅपिड अँटी बॉडी टेस्ट ?
रॅपिड अँटी बॉडी टेस्टसाठी महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र, तेलंगणा यासह इतर राज्यांनी ICMR कडे परवानगी मागितली होती.
कोरोनाचे रुग्ण वरळी, धारावी, पुणे, सांगली यासारख्या ठिकाणी आढळून येण्याचे प्रमाण जास्त आहे. तिथे टेस्टिंगचे प्रमाण वाढले तर ज्यांना कोरोनाची लागण आहे, मात्र लक्षणे दिसत नाहीत अशा रुग्णांना शोधणे सोपे जाईल.
ही टेस्ट कम्युनिटी स्प्रेडिंग रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असेल. ज्या ठिकाणी कोरोनाचा धोका अधिक आहे, अशा जिल्ह्यांमध्ये ही किट्स पाठवली जातील.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment