कोरोना : लाखो रुपयांचे किराणा सामान चाटणाऱ्या महिलेला अटक

कोरोना व्हायरसमुळे प्रत्येकजण विशेष खबरदारी घेत आहे. आपल्यामुळे इतरांना व्हायरसची लागण होऊ नये, यासाठी देखील विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. मात्र अशा स्थितीत कॅलिफोर्निया येथील एका महिलेला सुपर मार्केटमधील 1800 डॉलर्सचे (जवळपास 1.37 लाख रुपये) किराणा व अन्य सामान चाटल्यामुळे अटक करण्यात आले आहे.

साउथ लेक टाहोई पोलीस विभागाचे प्रवक्ते ख्रिस फिओरे यांनी सांगितले की, नेवाडाच्या सीमा लगत असलेल्या सेफवे स्टोरमधून अधिकाऱ्यांना कॉल आला होता. एक ग्राहक सामान चाटून ठेवत असल्याची माहिती त्यांना मिळाली. कोरोना व्हायरसचा प्रसार जगभरात वाढला असताना, ही सुचना मिळाली.

त्यांनी सांगितले की, अधिकारी तेथे गेल्यावर सेफवेच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की संशयिताने आपल्या हातात ज्वेलरी घेतली आहे. महिलेने आधी ज्वेलरी चाटली आणि त्यानंतर कार्टमध्ये सामान भरले.

या आरोपी महिलेचे नाव जेनिफर वॉकर असून, तिला खरेदी करायचे नव्हते तरी देखील तिने आपल्या कार्टमध्ये मांस, दारू व इतर वस्तू भरल्या होत्या, अशी माहिती फिओरे यांनी दिली. 53 वर्षीय महिलेला अटक करण्यात आले असून, संक्रमणाच्या भितीने सर्व सामान नष्ट करण्यात आले आहे.

Leave a Comment