एकेकाळी टेलर असलेल्या अभिनेत्याने सांगितली घरी मास्क बनविण्याची सोपी पद्धत

कोरोन व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांना मास्क घालण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे. बाजारात मास्कचा तुटवडा असल्याने घरच्या घरी देखील मास्क तयार केले जात आहे. प्रसिद्ध मल्याळम अभिनेते इंद्रान्स यांचा घरच्या घरी मास्क बनविण्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

त्यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून राज्य सरकारच्या ब्रेक द चेनच्या अभियानांतर्गत घरातील उपलब्ध सामानांपासून चांगला मास्क कसा तयार करायचा याची माहिती दिली आहे.

हास्य कलाकार आणि चरित्र अभिनेते असलेले इंद्रान्स यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये शेकडो भूमिका केल्या. मात्र या क्षेत्रात यांनी आधी ते एक टेलर होते. मेहनतीच्या जोरावर ते आज इथपर्यंत पोहचले.इंद्रान्स यांनी अभिनयात अनेक पुरस्कार जिंकले. आंतरराष्ट्रीय स्तरवार नाव कमवले.

जवळपास 5 मिनिटांच्या व्हिडीओमध्ये इंद्रान्स हे पूजाप्पुरा केंद्रीय कारागृहाच्या कैद्यांसोबत मास्क शिवताना दिसत आहेत. या व्हिडीओला अनेक कलाकारांनी देखील सेअर केले. या व्हिडीओला आतापर्यंत 25 हजारांपेक्षा अधिक जणांनी पाहिले आहे.

Leave a Comment