करोना भीतीमुळे १ युरो मध्ये विकायला काढले अलिशान घर


फोटो साभार डेली मेल
जगभरात करोनामुळे ८० हजाराहून अधिक मृत्यू ओढवले असताना आणि जगातील अनेक शहरे लॉकडाऊन खाली असताना युकेच्या कार्डिफ मधील एका रहिवाश्याने त्याचे अलिशान घर लिलावात काढले. करोना मुळे त्याला गिऱ्हाईक मिळेल की नाही या भीतीने लिलावात काढलेल्या या घराची सुरवातीची किंमत फक्त १ युरो (९३ रुपये) लावली गेली आणि पाहता पाहता १ हजार लोकांनी या घरासाठी बोली लावली.

युकेच्या सील अँड को या ऑक्शन कंपनीने दोन बेडरूम्सचे हे अलिशान घर लिलावात बोलीवर लावले. मालकाने करोनाच्या भीतीने हे घर कवडीमोल भावात गेले तरी चालेल अशी तयारी ठेवली होती त्यामुळे घराची किंमत १ युरो लावली गेली. हा लिलाव ऑनलाईन झाला आणि घराचे काही फोटो व अमौंट डीटेल्स जाहीर करण्यात आले होते. लोकांना या लिलावात मजा येऊ लागली आणि शेवटी हे घर १९ लाख ६० हजार रुपयांना विकले गेले. लिलावात आजपर्यंत अनेक घरे विकली गेली आहेत. पण घर प्रत्यक्षात न पहाताही त्यात गुंतवणूक करण्याचा हा पहिलाच प्रकार असल्याचे लिलाव कंपनीचे म्हणणे आहे.

Leave a Comment