देशात कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात झपाट्याने वाढ


5194 कोरोना बाधित, तर 149 लोकांचा मृत्यू; 401 रूग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली : देशामध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनाग्रस्तांची आतापर्यंतची आकडेवारी आरोग्य मंत्रालयाने जारी केली आहे. त्यानुसार, आतापर्यंत 5194 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 149 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 401 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर जगभरात 75,000 पेक्षा जास्त रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू युरोपात झाले आहेत.

राज्यानुसार कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीबाबत बोलायचे झाले तर देशभरातील सर्वाधिक रूग्ण हे महाराष्ट्रात आहेत. येथे 868 लोक कोरोनाग्रस्त आहेत. त्यापैकी 56 लोक बरे होऊन घरी परतले आहेत. तर 48 लोकांचा मृत्यू झाला आहे. आंध्रप्रदेशमध्ये 266, अंदमान निकोबारमध्ये 10, अरूणाचल प्रदेशमध्ये एक, आसाममध्ये 26, बिहारमध्ये 32, चंदिगढमध्ये 18, छत्तीसगढमध्ये 10, दिल्लीमध्ये 576, गोव्यात 7, गुजरातमध्ये 165, हरियाणामध्ये 90, हिमाचल प्रदेशमध्ये 13, जम्मू-काश्मिरमध्ये 116, झारखंडमध्ये 4, कर्नाटकात 175, केरळमध्ये 327, लदाखमध्ये 14, मध्यप्रदेशात 229, मणिपूर मध्ये दोन, मिझोरम मध्ये एक, ओदिशामध्ये 42, पद्दुचेरीमध्ये पाच, पंजाबमध्ये 91, राजस्थानमध्ये 288, तामिळनाडूमध्ये 621, तेलंगणामध्ये 364, त्रिपुरामध्ये एक, उत्तराखंडमध्ये 31, उत्तरप्रदेशमध्ये 305 आणि पश्चिम बंगालमध्ये 91 रूग्ण कोरोना बाधित आहेत.

याबाबत माहिती देताना आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, संक्रमणाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील असे रूग्ण ज्यांची प्रकृती स्थिर आहे. ‘कोविड-19 केयर सेंटर’ त्यांच्यासाठी तयार करण्यात आले आहेत. यामध्ये संसर्ग झाल्याचा संशय असणाऱ्या रूग्णांनाही ठेवण्यात येईल. हे सेंटर सरकारी इमारती, हॉटेल्स, लॉज यांसारख्या ठिकाणी तयार करण्यात येतील. COVID-19 रूग्णालयांशी ज्यांना जोडण्यात आले आहे. या रूग्णांना गरज भासल्यास तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात येईल.

अग्रवाल यांनी पुढे बोलताना सांगितले की, अशा रूग्णांचा समावेश दुसऱ्या टप्प्यात करण्यात आले आहे, जे आधीपासूनच डायबिटीज किंवा हृदयरोगासह इतर आजारांनी पीडित आहेत किंवा संसर्गामुळे ज्यांची प्रकृती गंभीर आहे. यांच्यासाठी ‘डेडीकेटिड कोविड-19 हेल्थ सेंटर’ तयार करण्यात येणार आहे. हे सेंटर्स रूग्णालयातच तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये ऑक्सिजनसह इतर आवश्यक गोष्टिंची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

कोरोनावरील एका संशोधच्या रिपोर्टचा हवाल्याने लॉकडाऊन या संकटाचा प्रभावी उपाय असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, कोरोनाचा एक रूग्ण दुसऱ्या रूग्णाच्या संपर्कात येण्या संदर्भात करण्यात आलेल्या या संशोधनात सांगण्यात आले आहे की, लॉकडाऊनचे पालन न केल्याने एक कोरोना बाधित व्यक्ती 30 दिवसांत 406 लोकांना बाधित करू शकते. त्यामुळे लॉकडाऊनचे 75 टक्क्यांपर्यंत पालन झाल्यामुळे संसर्ग झालेल्या व्यक्तीमुळे फक्त 2.5 लोकांपर्यंत संसर्ग होतो. त्यामुळे मी देशातील जनतेला लॉकडाऊनचे पालन करण्याचे आवाहन करतो.

Leave a Comment