जितेंद्र आव्हाड तुझा दाभोलकर होणार…, ट्विटच्या माध्यमातून इशारा


मुंबई – ठाण्यातील एका तरुणाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केल्यामुळे जितेंद्र आव्हाड सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट लिहिल्यामुळे आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप तरुण करत आहे. यामुळे जितेंद्र आव्हाड यांचे नाव चर्चेत असून मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर टीका होत आहे. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधक करत असून याबाबत सोशल मीडियावरही संताप व्यक्त होताना दिसत आहे. त्यातच तुझा दाभोलकर होणार असा इशाराच एका तरुणाने जितेंद्र आव्हाड यांना दिला असल्याने खळबळ उडाली आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या मारहाण प्रकरणामुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान ट्विटरवर कमेंट करताना एका तरुणाने ‘जितेंद्र आव्हाड तुझा दाभोलकर होणार’ असे म्हटल्यामुळे सध्या राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून पोलीस काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान या पेश्याने अभियंता असलेल्या या तरुणाने जितेंद्र आव्हाड यांच्या संरक्षणासाठी असलेल्या सरकारी पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकली म्हणून आपल्याला उचलून आणले आणि आव्हाड यांच्या बंगल्यावर आणून बेदम मारहाण केली. त्यावेळी आव्हाड हे उपस्थित होते आणि त्यांच्यादेखत ही मारहाण केली गेली, अशी तक्रार ठाण्यातील एका तरुणाने केली आहे. हा तरूण पेशाने इंजिनिअर असून तो संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment