कोरोना : लॉकडाऊन संपल्यानंतर वुहानमधील नागरिकांचा आनंदोत्सव

चीनच्या वुहानमध्ये सुरू झालेले कोरोना व्हायरसने आज जगभरात थैमान घातले आहे. जगभरात या व्हायरसने थैमान घातले असले तरी, जेथून या व्हायरसची सुरूवात झाली त्या वुहान शहरातील लॉकडाऊन 11 आठवड्यानंतर समाप्त झाला आहे.

वुहानचे लॉकडाऊन पाहून जगभरातील देशांनी व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊनचे मॉडेल स्विकारले होते. आता अधिकाऱ्यांनी वुहानच्या नागरिकांना बाहेर जाण्याची परवानगी दिली आहे. आता शहरातील 1.1 कोटी लोकांना बाहेर जाण्यासाठी विशेष परवानगीची गरज नाही. मात्र स्मार्टफोन अ‍ॅपद्वारे कोणती व्यक्ती संक्रमित आहे व कोणती नाही हे समजते.

या निमित्ताने यांगतेज नदीच्या दोन्ही बाजूला लाईट शो, इमारती आणि पुलांवर आरोग्य कर्मचारी रुग्णाला घेऊन जात असल्याच्या प्रतिमा उभारण्यात आल्या होत्या. किनाऱ्यावर आणि पुलावर लोक ध्वज फडकवत ‘वुहान पुढे जा’चे नारे देत होते. चीनचे राष्ट्रगीत देखील गात होते.

शहरातील एक व्यक्ती तोंग झेंगकुन म्हणाले की, मला बाहेर पडून 70 दिवसांपेक्षा अधिक दिवस झाले. जेथे राहत होते, त्या इमारतीमधील लोक संक्रमित होते. यामुळे पुर्ण इमारत बंद करण्यात आली होती.

लॉकडाऊन संपल्यानंतर रस्त्यावर गाड्या, शहरातून बाहेर जाण्यासाठी लोक विमान, रेल्वेची वाहत पाहत होते. तर अनेकजण कामावर जाण्यास उत्सुक होते.

चीनच्या वुहान शहरातूनच या व्हायरसची सुरूवात झाली होती. येथेच पहिला कोरोनाग्रस्त सापडला होता. चीनमधील 82 हजार कोरोनाग्रस्तांपैकी 50 हजार केवळ वुहानमधीलच होते.

Leave a Comment