वैद्यकीय सल्ल्याशिवाय हायड्रोक्सीक्लोरोक्वीन घेणे ठरू शकते धोकादायक

अमेरिकेच्या राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताकडे मलेरियावरील उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधांची मागणी केली आहे. या औषधामुळे कोरोनावर मात करता येईल का ? याविषयी जगभरात चर्चा सुरू झाली आहे. मात्र या औषधाचे स्वतःहून प्रयोग केल्यास आरोग्यासाठी धोकादायक ठरेल.

हे औषध रुग्णांवर उपचार करणारे आरोग्य कर्मचारी आणि ठरावीक नातेवाईकांनाच दिले जाईल, असे सरकारने निश्चित केले आहे. या औषधाचा पुरेसा साठा असल्याचे भारतीय औषध उद्योगाने सांगितले आहे.

काय आहे हायड्रोक्सीक्लोरोक्विन ?

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचे ब्रँड नाव प्लक्वेनिल आहे, जे मलेरियाच्या उपचारात वापरले जाते. याशिवाय रिमोटाइड आर्थरायटिस आणि गर्भावस्थेदरम्यान गुडघे दुखत असल्यास वापरले जाते. 1955 मध्ये अमेरिकेने या औषधास परवानगी दिली. डब्ल्यूएचओने देखील याला गरजेच्या औषधांमध्ये ठेवले आहे. 2017 मध्ये, अमेरिकन डॉक्टरांद्वारे हायड्रोक्सीक्लोरोक्विन हे सर्वाधिक वेळा लिहिलेले औषध होते, जे जवळजवळ 50 लाख लोकांनी वापरले.

औषध खाल्ल्यानंतर समस्या –

हायड्रॉक्सीक्लोरोक्विन खाल्ल्यानंतरही विविध प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. नाक वाहणे, पोटात वेदना आणि वारंवार शौचास जाणे, डोके दुखी, उलट्या, पाचनतंत्र खराब होणे या सारख्या समस्या होऊ शकतात.

अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ एलर्जी आणि संसर्गजन्य रोगांचे संचालक डॉ. एंथनी फोसे यांनी या औषधाने कोरोना रूग्णांवर उपचारास विरोध दर्शविला आहे. त्यांनी औषधाच्या गुणवत्तेवर प्रश्न निर्माण करत, हे औषध किती फायदेशीर ठरेल याचा पुरवा नसल्याचे म्हटले आहे.

कोरोनाग्रस्तांवरवर उपचार करण्यात अडचण येऊ नये म्हणून राजस्थान सरकारने घाऊक विक्रेते, बाजार आणि किरकोळ दुकानदारांच्या कडील हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध आपल्या ताब्यात घेतले आहे.

Leave a Comment