कोरोना : रामायणाचा संदर्भ देत ब्राझीलची भारताकडे औषधे देण्याची विनंती

जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार वेगाने वाढत असून, यावरील उपचारासाठी वैज्ञानिक संशोधन करत आहे. मात्र या आजारावरील उपचारासाठी परिणामकारक ठरणारे हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधाची मागणी अनेक देश भारताकडे करत आहेत. अमेरिकेसह 30 देशांनी भारताकडे हे मलेरियावर परिणामकारक ठरणारे हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधांची निर्यात करण्याची मागणी केली आहे. आता या यादीत ब्राझीलचा देखील समावेश झाला.

ब्राझीलचे पंतप्रधान जेअर बोल्सोनारो यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहित हे औषध निर्यात करण्याची विनंती केली आहे. याशिवाय बोल्सोनारो यांनी यात रामायणातील प्रसंगाचा देखील उल्लेख केला आहे.

बोल्सोनारो यांनी पत्रात लिहिले की, ज्या प्रमाणे हनुमानाने भगवान रामाचे भाऊ लक्ष्मण यांना वाचवण्यासाठी हिमालयामधून संजीवनी आणली आणि ज्याप्रमाणे येशूने आजारी लोकांना बरे केले. त्याचप्रमाणे भारत आणि ब्राझील देखील मिळून या जागतिक संकटावर मात करतील.

याआधी पंतप्रधान मोदी आणि ब्राझीलचे राष्ट्रपती बोल्सोनारो यांनी या जागतिक संकटाविषयी फोनवर चर्चा केली होती.

दरम्यान, या व्हायरसचा सर्वाधिक परिणाम झालेल्या देशांना मर्यादित प्रमाणात औषधांची निर्यात करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.

Leave a Comment