जगभरात कोरोनाचे तांडव, 14 लाखांहून अधिक बाधित; 81 हजारांपेक्षा जास्त मृत्युमुखी


मुंबई : जगभरात कोरोनाने अक्षरशः मृत्यु तांडव सुरु केल्यामुळे मृत्यूंच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. जगभरात आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे 81 हजारांहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर संसर्ग झालेल्यांची संख्या 14 लाखांच्या पार गेली आहे. कोरोना व्हायरसचे नवे केंद्र अमेरिका झाल्याचे चित्र सध्यातरी दिसून येत आहे. कोरोनाची लागण झालेल्यांची अमेरिकेतील संख्या 4 लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. आतापर्यंत येथे 3,95,612 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

कोरोना बाधितांची जगभरात सर्वाधिक संख्या अमेरिकेत आहे. येथे 3,95,612 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. अमेरिकेतील मृतांचा आकडा 12 हजार पार गेला आहे. अमेरिकेमध्ये कोरोनामुळे 12790 लोकांचा मृत्यु झाला आहे. अमेरिकेनंतर स्पेनमध्ये सर्वाधिक कोरोना बाधित असून एक लाखांहून अधिक कोरोनाग्रस्त आहेत. तर मृतांचा आकडा 14 हजार पार गेला आहे.

कोरोनाचे मृत्यूतांडव अमेरिका आणि स्पेननंतर इटलीमध्येही पाहायला मिळत आहे. आतापर्यंत 1,35,586 लोकांना इटलीमध्ये कोरोनाची लागण झाली आहे. तर 17121 लोकांचा मृत्यु झाला आहे. गेल्या 24 तासात इटलीमध्ये 604 लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये आतापर्यंत 24 हजारांहून अधिक लोक कोरोनामुक्त झाले असून ते आपल्या घरी परतले आहेत.

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव फ्रान्स आणि जर्मनीमध्येही पाहायला मिळत आहे. फ्रान्समध्ये 1,09,069 लोकांना या जीवघेण्या व्हायरसचा संसर्ग झाला आहे. कोरोना व्हायरसचा संसर्गामुळे आतापर्यंत फ्रान्समध्ये हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 19 हजारांहून अधिक लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या जर्मनीमध्ये आतापर्यंत 1,07,663 वर पोहोचली आहे. तसेच जर्मनीमध्ये या जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे 2016 लोकांचा मृत्यु झाला आहे. गेल्या 24 तासांत येथे 206 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 36 हजारांहून अधिक लोक रिकव्हर झाले आहेत.

कोरोनापुढे संपूर्ण जग हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे. या देशांव्यतिरिक्त इराण, ब्रिटन, भारत, टर्की, बेल्जियम, नेदरलँड्स आणि कॅनडा या देशांमध्येही कोरोनाने हैदोस घातला आहे. तर चीनमधील ज्या वुहान प्रांतात कोरोना व्हायरसची सुरुवात झाली होती. तिथे मंगळवारी या व्हायरसमुळे एकाही कोरोना बाधिताचा मृत्यू झालेला नाही.

Leave a Comment