कोरोना : लसीच्या शोधासाठी देशांनी 8 अब्ज डॉलर द्यावेत, 165 प्रसिद्ध लोकांनी लिहिले पत्र

कोरोना व्हायरस महामारीने जगभरात थैमान घातले असून, यामुळे आतापर्यंत हजारो जणांचा मृत्यू झाला आहे. वैज्ञानिक या व्हायरसवर लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. आता जगभरातील 165 प्रसिद्ध लोकांनी 20 प्रमुख औद्योगिक देशांना पत्र लिहित 8 अब्ज डॉलरचे योगदान देण्याचे आवाहन केले आहे. याद्वारे कोव्हिड-19 वरील लस आणि उपचारावरील संशोधनास मदत होईल.

जागतिक नेते, मंत्री, अधिकारी आणि वैज्ञानिकांनी अनेक देशांच्या सरकारला पत्र लिहित कमकुवत आरोग्य प्रणाली असणारे देश आणि विशेष दृष्ट्या कमजोर असणाऱ्या देशांना मदत करण्यासाठी 35 अब्ज डॉलर व विकासशील देशांसाठी कमीत कमी 150 अब्ज डॉलर मदत करण्याचे देखील आवाहन केले आहे.

या पत्रावर संयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव बान की मून, 92 माजी राष्ट्रपती आणि पंतप्रधान, इथियोपियाचे पंतप्रधान, बांगलादेशच्या पंतप्रधानांसह अनेक मोठ्या संस्थेच्या आजी-माजी प्रमुखांची स्वाक्षरी आहे.

Leave a Comment