गावस्करने जेवढी शतके तेवढे लाख करोनासाठी दिले दान


फोटो साभार इनएक्झीक्युटीव्ह
देशात फैलावलेल्या करोना प्रतिकारासाठी सर्व क्षेत्रातून मदतीचा हात पुढे केला जात असून त्याला खेळाडूही अपवाद नाहीत. भारतीय क्रिकेट टीमचा माजी कप्तान सुनील गावस्कर याने पीएम केअर्स आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री फंडात मिळून ५९ लाख रुपये दान केले मात्र याची महिती स्वतः दिली नव्हती.

गेल्या आठवड्यात गावस्कर यांनी ही देणगी दिली आहे. त्यांचे जवळचे मित्र अमोल मुजुमदार यांनी ट्विटर वरून गावस्कर यांनी दिलेल्या देणगीचा खुलासा केला तर गावस्कर यांचा मुलगा रोहन याने ५९ लाख रुपये देणगी देण्यामागचे कारण स्पष्ट केले. रोहन यांच्या म्हणण्यानुसार गावस्कर यांनी पीएम केअर्स फंडासाठी ३५ लाख तर महाराष्ट्र मुख्यमंत्री मदतनिधीसाठी २४ लाख रुपये देणगी दिली आहे.

गावस्कर यांनी भारतासाठी खेळताना ३५ शतके केली म्हणून पीएम केअर्स फंडात ३५ लाख दिले आहेत तर मुंबईकडून खेळताना २४ शतके केली म्हणून महाराष्ट्र मुख्यमंत्री निधी मध्ये २४ लाख रुपये देणगी दिली आहे.

Leave a Comment