कोरोनाला रोखण्यासाठी भारतीय इंजिनिअर्सचा असाही प्रयत्न

भारतासह जगातील सर्वच देश सध्या कोरोना व्हायरसच्या महामारीचा सामना करत आहेत. अनेक देश लॉकडाऊन आहेत. अशा स्थितीत भारतीय इंजिनिअर्स इनोव्हेशंस करत आहेत. कोव्हिड-19 वर मात करण्यासाठी टॉप आयआयटी आणि भावी इंजिनिअर्सची टीम इनोव्हेशंस करत आहेत, त्याविषयी जाणून घेऊया.

सध्या देशातील आयआयटी संस्थेत लस खोजण्यापासून ते व्हायरसची तपासणी करण्यासाठी नवनवीन पद्धतींवर काम सुरू आहे. एका आयआयटीने आपल्या कॅम्पसला क्वारंटाईन वॉर्ड करण्यास परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे इतर आयआयटी संस्था सुध्दा इनोव्हेशेंसमध्ये गुंतले आहेत.

आयआयटी दिल्लीच्या संशोधकांनी कोरोना व्हायरसच्या चाचणीसाठी नवीन पद्धत शोधली आहे. या चाचणी किटचा खर्च खूपच कमी आहे.  आयआयटी दिल्लीचा दावा आहे की यामुळे किट उपलब्ध नसल्याची समस्या दूर होईल, कारण हे देशातच तयार करण्यात येतील. अद्याप याला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही), पुणे कडून मान्यता मिळायची आहे.

आयआयटी-गुवाहाटीच्या संशोधकांची एक टीम कोरोना व्हायरससाठी एक चाचणी किट तसेच लस विकसित करण्यासाठी कार्यरत आहे. कोविड 19 विरोधातील लढाईत आयआयटी खडगपूरच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती करण्यासाठी १२ प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये व्हिडिओ बनवले आहेत. विद्यार्थ्यांनी आतापर्यंत आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तामिळ आणि तेलगू भाषेत व्हिडिओ तयार केले आहेत.

याशिवाय आयआयटी हैदराबादने हँड सॅनिटायझर्स तयार केले आहेत व त्यांना कॅम्पसमध्ये तसेच समुदायामध्ये विनामूल्य उपलब्ध करुन दिले आहे. हे सॅनटायझर्स आयआयटी हैदराबादच्या संशोधक शिवकल्याणी अडेपू आणि मुद्रिका खंडेलवला यांनी तयार केले आहे.

सिद्धार्थ शर्मा आणि वैभव जैन या आयआयटी रुडकीच्या दोन संशोधकांनी 150 लीटरहून अधिक हर्बल हँड सॅनिटायझर तयार केले आहेत. यात मॉइस्चरायझरचे गुण देखील आहेत. याला आयआयटी रुडकीच्या भागात मोफत वाटण्यात येत आहे.

आयआयटी-खडगपूर येथील संशोधकांनी देखील दोन वेगवेगळे अल्कोहोल-आधारित हँड सॅनिटायझर्स तयार केले आहेत. या टीममध्ये संशोधक अतुल कुमार ओझा, अयान गोप, अनुरूप मुखोपाध्याय यांचा समावेश होता.

तसेच, आयआयटी-बॉम्बेने आपल्या चार वसतिगृहाच्या परिसराचा उपयोग क्वारंटाईन वॉर्ड म्हणून वापरण्यास परवानगी दिली आहे. याशिवाय तेलंगानाचे मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ, गौतम बुद्ध विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, केंद्रीय विद्यालयासह अनेक संस्थांनी आपली खोल्या आणि हॉल आरोग्य संस्था म्हणून बनविण्यास परवानगी दिली आहे.

Leave a Comment