धारावीत आणखी दोन कोरोनाग्रस्त सापडल्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या सातवर


मुंबई – आशियाखंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीत आणखी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. कोरोनाची लागण झालेल्या महिलेच्या वडील आणि भावाला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आल्यानंतर डॉक्टर बलिगा नगर परिसर पोलिसांकडून सील करण्यात आला आहे. दरम्यान परिसरात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरु आहे. त्याचबरोबर धारावीतील कोरोनाग्रस्तांची संख्या सातवर पोहोचली आहे. यामध्ये एका मृताचाही समावेश आहे.

तत्पूर्वी धारावीतील ३० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले होते. याच महिलेच्या वडिलांना आणि भावाला कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान धारावीत दिल्लीच्या मरकजसाठी गेलेले पाचजण गेले होते. धारावीत ते पाचही जण राहिले होते. हे लोक ज्याच्या फ्लॅटमध्ये राहिले त्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. धारावीत आलेले तबलिगी जमातचे पाच लोकनंतर केरळला गेले. त्यांच्या संपर्कात आलेल्या धारावीत राहणाऱ्या ५९ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आणि त्याचा मृत्यू झाला.

Leave a Comment