लॉकडाऊन : चिंता, निराशेवर अशा पद्धतीने करा मात

लॉकडाऊनमुळे लोक आपआपल्या घरात कैद आहेत. अशा स्थितीत काम नसल्यास कितीही प्रयत्न केला तरी मन शांत ठेवणे, संयम बाळगणे कठीण जाते. कितीही प्रयत्न केला तरी कंटाळा, निराशा, चिंता या गोष्टीने प्रत्येकजण ग्रासला जातो. अशा कठीण परिस्थितीत डिप्रेशन, निराशा टाळण्यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

चिंतामुक्त रहा –

चिंतामुक्त राहण्यासाठी नेहमी सकारात्मक विचार करा. तुम्ही आजारी पडाल असा विचार करू नका. स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी तुमच्या मनात येईल ते करा, जेणेकरून तुम्हाला आनंद मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा.

घाबरू नका –

व्हायरस संदर्भातील माहिती समजल्यावर घाबरून जावू नका. वारंवार त्याविषयी जाणून घेण्याऐवजी दिवसाला एकदाच त्याबाबत माहिती घ्या. व्हायरसविषयी कमी विचार करा, यामुळे चिंता व निराशा दूर होईल. एखाद्या व्यक्तीला फोन केल्यास त्याच्याशीही याविषयी बोलणे टाळावे.

मन शांत ठेवा –

भिती वाटत असल्यास आरामशीर बसून मन शांत ठेवा. 10 सेंकद श्वास रोखून धरावा व सोडावा. असे केल्याने चिंता दूर होईल व बरे वाटेल.

दररोजच्या सवयी बदला –

गॅजेट्सपासून लांब रहा. पुस्तक वाचा, गार्डन अथवा बाल्कनीत बसा. गाणी ऐकावित, क्षमतेनुसार व्यायाम करा. नियमित पोष्टिक आहारासोबत पुर्ण झोप घ्या.

गॅजेट्स वापरताना घ्या काळजी –

कोरोना पासून वाचण्यासाठी डिव्हाईसची स्क्रिन, खिडकीची काच स्वच्छ ठेवा. खासकरून मोबाईल वारंवार साफ करा. याशिवाय बँकेत गेल्यास दुसऱ्याकडून पेन मागू नये. हॉस्पिटलमध्ये गेटचे हँडल अथवा इतर ठिकाणी स्पर्श करणे टाळावे. अनेकजण वापरत असलेले डिव्हाईस वापरणे टाळावे.

Leave a Comment