विमा कंपन्या नाकारू शकणार नाही कोरोनाग्रस्ताचा क्लेम

कोरोना व्हायरसमुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास विमा कंपन्यांना क्लेम नाकरता येणार नाही. जीवन विमा परिषदेने सांगितले की, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील विमा कंपन्यांना कोव्हिड-19 संबंधी कोणत्याही मृत्यूच्या दाव्याचा क्लेम द्यावा लागेल. या संबंधी क्लेम प्रोसेस करणे त्यांना अनिवार्य आहे.

या प्रकरणात ‘फोर्स मेजर’ची तरतूद लागू होणार नाही. ही अशी तरतूद आहे, ज्यात विमा कंपन्या नैसर्गिक आपत्ती, दंगली, साथीचे रोग किंवा युद्ध यासारख्या अनपेक्षित परिस्थितीत दावे नाकारतात. सर्व विमा कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना व्यक्तीगतरित्या ग्राहकांना या संदर्भात माहिती दिली आहे.

परिषदेचे महासचिव एसएन भट्टाचार्य म्हणाले की, कोव्हिड-19 चा जागतिक आणि स्थानिक स्तरावर वाढत्या प्रकोपामुळे जीवन विमा प्रत्येक घरासाठी गरजेचे बनले आहे. लॉकडाऊनमध्ये विमा धारकांना कोणतीही समस्या येणार नाही, यासाठी जीवन विमा उपाययोजना करत आहेत. कोव्हिड-19 संबंधी मृत्यूचा दावा आणि इतर विमा सेवा डिजिटल माध्यमातून मिळत राहतील.

Leave a Comment