कोरोना : सर्जिकल मास्कद्वारे कमी होऊ शकतो व्हायरसचा प्रसार

सर्जिकल मास्क लावल्याने कोरोना व्हायरस महामारीचा प्रसार रोखण्यास मदत मिळू शकते, असा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे. हे संशोधन नेचर मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.

अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार, आतापर्यंत सर्जिकल मास्कचा वापर हा इन्फ्लुएंजा व्हायरसचा प्रसार कमी करण्यासाठी केला जात होता. मात्र कोरोना व्हायरससह अन्य व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी या मास्कच्या वापराबाबत कमी माहिती उपलब्ध आहे.

संशोधकांनी या अभ्यासासाठी श्वासाची समस्या असणाऱ्या 246 रुग्णांवर संधोशन केले. यातील काही जणांना सर्जिकल मास्क घालून आणि काहींना विना मास्क लावता गेसुंडाइट मशीनमध्ये ठेवण्यात आले होते.

संशोधकांना आढळले की, संक्रमित 111 लोकांनी शिंकल्यानंतर मास्कद्वारे थेंब बाहेर येण्यापासून रोखले. ज्यामुळे अन्य लोकांना व्हायरसचा संसर्ग होण्याची शक्यता खूप कमी आहे. हाँगकाँग युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनुसार, सर्जिकल मास्कदेखील कोरोना व्हायरसचा प्रसार रोखू शकतो की नाही हे शोधण्यासाठी देखील संशोधन करणे आवश्यक आहे.

Leave a Comment