जीनोम सीक्वेंसिंगद्वारे कोरोनावर मात करण्याचा वैज्ञानिकांचा प्रयत्न

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून, याची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जगभरातील वैज्ञानिक या व्हायरसच्या जीनोम सीक्वेंसिगद्वारे याचा प्रसार रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटी अप्लाइड भौतिकी प्रयोगशाळेचे वैज्ञानिक पीटर थायलिन आणि थॉमस मेहोक यांच्यानुसार, जीनोम सीक्वेंसिग करून व्हायरसचे वेगवेगळे रुप ओळखता येतील. याद्वारे उपचार तर मदत मिळेलच, सोबतच व्हायरस नवीन रुप घेऊन पसरत असेल, तर त्याची देखील ओळख होईल. या संदर्भात अमर उजालाने वृत्त दिले आहे.

जीनोम सीक्वेंसिंग काय आहे आणि गरजेचे का ?

जीनोम म्हणजे कोणत्याही जीवात असलेले अनुवांशिक घटक होय. जीनोम सिक्वेन्सींग तंत्रज्ञानाद्वारे वैज्ञानिकांना विषाणूच्या डीएनए आणि आरएनएमध्ये उपस्थित आनुवांशिक माहिती जाणून घेण्यास आणि परिभाषित करण्यास मदत केली जाते. याद्वारे रुग्णात आढळलेल्या व्हायरस कोठून आला हे समजते.

व्हायरसचा प्रसार होतोना, तो कशाप्रकारे विकसित होतो याचा शोध वैज्ञानिक घेत आहेत. जगभरात कोरोनाचे एक हजार जिनोम समोर आले आहेत. व्हायरसची पुर्ण सीक्वेंसिग असल्यास या व्हायरसला रोखण्यास मदत होईल.

व्हायरस कसा पसरत आहे ?

व्हायरस जेव्हाही आपले रुप बदलेल. त्याच्या जिनोम सीक्वेंस वैज्ञानिक शोधू शकतात. एखाद्या विशिष्ट ठिकाणी व्हायरस कसा आणि कोणत्या व्यक्तीद्वारे आला, त्याचे रूप किती वेळेत बदलले आणि कोणत्या व्यक्तीमध्ये बदलले ? ही अशी माहिती आहे, जी समजल्यावर व्हायरसच्या प्रसाराचे प्रमाण आणि वेळेचे अचूक मूल्यांकन करता येईल.

उपचारात मदत कशी होणार ?

जीनोम सीक्वेंस समजल्यावर व्हायरस किती लोकांमध्ये, कोणत्या खास क्षेत्रात पसरला आहे, याचा अंदाज समजतो. या अंदाजाद्वारे उपचारासाठी आधीच तयारी करता येईल.

व्हायरसचे अनुवांशिक घटक –

रुग्णाच्या नाकातून मिळालेले स्वॅबचे सँपलद्वारे डीएनए सीक्वेंसरमधून अनुवांशिक तत्व वेगवेगळे केले जातात. जेवढ्या वेगवेगळ्या ठिकाणांवरून सँपल गोळा केले जातात, तेवढीच जीनोम सीक्वेंसिग विस्तृत होते. या डाटाला डाटाबेसमध्ये अपलोड केले जाते व त्यातून व्हायरसच्या नवीन स्वरूपाबाबत सर्वांना माहिती मिळते.

Leave a Comment