लॉकडाऊन : अशी आहे देशातील शहरांची स्थिती, पहा फोटो

कोरोना व्हायरस महामारीमुळे जगभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. भारतात देखील 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नेहमी गजबजलेली ठिकाण आता ओस पडली आहेत.

 

लॉकडाऊनमुळे वाहतूक सेवा, कंपन्या, फॅक्ट्री सर्वकाही बंद आहेत. पर्यटन स्थळ, शॉपिंग मॉल, मंदिर, समुद्र किनारा सर्व सूनसान आहेत. लॉकडाऊनमुळे देशभरातील स्थिती कशी आहे हे फोटोद्वारे जाणून घेऊया.

Image Credited – Amarujala

हा फोटो नवी दिल्लीच्या खान-ए-खाना मस्जिदजवळील एका रस्त्याचा आहे. नमाजसाठी आणि पर्यटकांमुळे नेहमी भरलेला असणार हा रस्ता आता सुनसान आहे.

Image Credited – Amarujala

हे दृश्य ओडिशा येथील पुरी समुद्र किनाऱ्याचे आहे. लॉकडाऊनमुळे हा किनारा पुर्णपणे बंद आहे.

Image Credited – Amarujala

लॉकडाऊनच्या आधी नवी दिल्लीतील कनॉट प्लेसला असे पाहण्याची कल्पनाच कोणी केली नसेल. मात्र आता हे ठिकाण देखील रिकामे आहे.

Image Credited – Amarujala

हा फोटो मुंबईच्या डॉ. बलिगा नगर येथील आहे, जे धारावीजवळ आहे. येथे तीन कोरोनाग्रस्त सापडले असल्याने, संपुर्ण भाग बंद करण्यात आला आहे.

Image Credited – Amarujala

प्रयागराजमध्ये भाविकांची नेहमी गर्दी असते. मात्र येथेही सर्वकाही बंद आहे, नाव देखील नदी किनाऱ्यावर लावलेल्या आहेत.

Image Credited – Amarujala

चेन्नईचा एनोर एक्सप्रेस वे देशव्यापी लॉकडाऊनमुळे ओसाड झाला आहे.

Image Credited – Amarujala

बंगळुरू येथील या फोटोमध्ये पक्षी रस्त्यावर निर्भीडपणे दिसत आहेत, यातूनच स्पष्ट होते की माणसांचे प्रमाण किती कमी झाले आहे.

Leave a Comment